RTE Admission : ‘आरटीई’ प्रवेशासाठी 10 हजार अर्ज!

Nashik News : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्‍के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे.
RTE Admission
RTE Admissionesakal

Nashik News : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्‍के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. अवघ्या नऊ दिवसांत नाशिक जिल्ह्यातून नऊ हजार ९४४ अर्ज दाखल झाले आहेत. ३१ मेपर्यंत अर्जाची मुदत असल्‍याने अर्जदार विद्यार्थ्यांची संख्या २० हजारांपर्यंत पोचण्याची शक्‍यता आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. (10 thousand applications for RTE admission)

यापूर्वीच्‍या शिक्षण विभागाच्‍या धोरणानुसार स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था व अनुदानित शाळांचा समावेश योजनेत करण्यात आला होता. मात्र या प्रक्रियेला पालकांचा अत्‍यल्‍प प्रतिसाद मिळाला होता. न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर खासगी शाळांचा या योजनेत समावेश केला आहे. नव्‍याने अर्जाची प्रक्रिया राबविली जात असून, त्‍यास पालकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

गेल्‍या १७ मेस अर्ज भरण्यास सुरवात झाली असताना अवघ्या नऊ दिवसांत नाशिक जिल्ह्यात दाखल अर्जांची संख्या दहा हजारांवर पोचली. अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत दाखल अर्जांची संख्या दुपटीवर जाण्याची शक्‍यता असून, गतवर्षीप्रमाणे वीस हजारांहून अधिक अर्ज दाखल होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. (latest marathi news)

RTE Admission
Nashik Women Police: निर्भया-दामिनी पथके टवाळखोरांविरोधात आक्रमक! महाविद्यालय, खासगी क्लासेसला भेट; छेडछाडी करणाऱ्यांना चोप

अर्ज संख्येत राज्‍यामध्ये नाशिक पाचव्‍या स्‍थानी

राज्‍यस्‍तरावर दाखल अर्ज संख्येच्‍या तुलनेत नाशिक जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो. सर्वाधिक ३४ हजार ५५९ अर्ज पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्‍यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात १३ हजार ५४३ अर्ज, नागपूर जिल्ह्यात १५ हजार ३६२ अर्ज आणि औरंगाबाद जिल्ह्यात दहा हजार १५ अर्ज दाखल झाले आहेत. मुंबईपेक्षाही नाशिक जिल्ह्यात अधिक संख्येने अर्ज दाखल आहेत.

नाशिक जिल्ह्याची स्‍थिती अशी-

- योजनेत समाविष्ट शाळा- ४२८

- प्रवेशासाठी उपलब्‍ध जागा- ५,२७१

- दाखल अर्जांची संख्या- ९,९४४

राज्‍यस्‍तरावरील स्‍थिती अशी-

- योजनेत समाविष्ट शाळा- ९,१९७

- प्रवेशासाठी उपलब्‍ध जागा- १,०४,७३५

- दाखल अर्जांची संख्या- १, ६५, ७१४

RTE Admission
Nashik Police Promotion : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उपनिरीक्षकपदी बढती! सुखद धक्का; शहर आयुक्तालयातील 5 जणांचा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com