Nashik News : ‘ओल्ड स्कूल’ सायकलवर 100 किलोमीटरची स्वारी

Nashik : सायकल चालविण्याची क्रेझ आरोग्याबद्दलच्या सजगेतेमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत समाजात जागृतीही फार मोठ्या प्रमाणात होत आहे.
Sanjay Bhise successfully completed the Pune Cyclothon on Vingear's bicycle.
Sanjay Bhise successfully completed the Pune Cyclothon on Vingear's bicycle.esakal

Nashik News : सायकल चालविण्याची क्रेझ आरोग्याबद्दलच्या सजगेतेमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत समाजात जागृतीही फार मोठ्या प्रमाणात होत आहे. यास अनुसरून प्रत्येक मोठ्या शहरात सायकलिस्टचे ग्रुप स्थापन झाले आहे. ग्रुपच्या माध्यमातून सायकल चालवा चळवळ जोमाने रुजत आहे. विविध मोहिमा, सायक्लॉथॉन सारखे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जात आहे. मात्र, काळ बदलला तसा सायकलचे रुपडे बदलले. ()

इलेक्ट्रिक, वेगवान सायकल, गिअर रेसिंग सायकल, अत्याधुनिक सुविधा असलेल्या सायकलने सध्याच्या मार्केट व्यापले आहे. आजकाल ज्याच्या त्याच्या हाती अशा अत्याधुनिक सायकली दिसून येतात. त्याच सायक्लोथॉन सारख्या स्पर्धेत सहभाग घ्यायचा तर अशा सायकली आवश्‍यक असतात, मात्र या सर्वाला फाटा देता विनागिअरच्या ‘ओल्ड स्कूल’ सायकलवर कोणी १०० किलोमीटरची सायक्लोथॉन पूर्ण केली तर विश्‍वास बसणार नाही.

श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) येथील संजय रावजी भिसे यांनी सीझन-३ पुणे सायक्लोथॉन मध्ये ही यशस्वी कामगिरी केली. श्री. भिसे हे श्रीरामपूर सायकलिंग क्लबचे सदस्य असून, पेशाने शिक्षक आहेत. क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. ग्रुपचे प्रमुख डॉ. संकेत मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली बारा स्पर्धकांनी रविवारी (ता. १७) पुणे येथे झालेल्या सायक्लोथॉनमध्ये सहभाग घेतला.  (latest marathi news)

Sanjay Bhise successfully completed the Pune Cyclothon on Vingear's bicycle.
Nashik News : होळकर पुलाखालील मॅकेनिकल गेटला मुहूर्त! गांधी तलावातील प्रवाह राहणार बंद

स्पर्धेत हजारो स्पर्धकांकडे आधुनिक पद्धतीच्या गिअरच्या सायकल होत्या. केवळ संजय भिसे यांच्याकडे विनागिअरची जुन्या पद्धतीची हिरो जेट २४ सायकल होती. साडेपाच तासात स्पर्धा पूर्ण करायची असल्याने सुरवातीपासूनच श्री. भिसे यांनी वेगाकडे लक्ष दिले. ३६ वर्षांपासून पुढील वयोगटात त्यांचा समावेश होता. अनेक दिग्गज स्पर्धेत असल्यामुळे तसेच ‘ओल्ड स्कूल’ सायकलवर स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणे हेच मोठे आव्हान होते.

मात्र, भिसे यांनी अडचणीवर जिद्दी, चिकाटीच्या जोरावर कुठेही न थांबता हे अंतर ४ तास १२ मिनीट ४५ सेकंदात पूर्ण केले. त्यांचा सहभाग संपूर्ण स्पर्धेत कौतुक, चर्चेचा विषय ठरला. त्यांच्यासोबत सहभागी डॉ. संकेत मुंदडा यांनी हे अंतर ४ तासात, तर विनायक शिंदे यांनी ५० किलोमीटर अंतर २ तासात पूर्ण केले.

‘तुम्हारे मसल बहुत मजबूत है.!

संजय भिसे स्पर्धेत वेगात सायकल चालवत असतानाच पाठीमागून आवाज आला ‘तुम्हारे मसल बहुत मजबूत हैं!. ही प्रतिक्रिया चक्क आयर्नमॅन आयपीएस कृष्णप्रकाश यांची होती. ही प्रतिक्रिया ऐकूनच श्री. भिसे हे भारावून गेले व ‘सर मेरा रेस कंम्प्लिट हो गया. मै जीत गया’, अशी भावना भिसे यांनी व्यक्त केली.

Sanjay Bhise successfully completed the Pune Cyclothon on Vingear's bicycle.
Nashik News : संभाजी स्टेडिअम समस्यांच्या विळख्यात! प्रशासकीय राजवटीमध्ये मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com