Nashik RTO Revenue : आकर्षक क्रमांकातून ‘आरटीओ’ला 11 कोटींचा महसूल; 11 हजार 809 वाहनधारकांची पसंती

RTO Revenue : आकर्षक वाहन क्रमांक खरेदीकडे वाहनधारकांचा कल वाढत चालला असून, नोंदीतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महसुलात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत १ कोटी ७५ लाख ८१ हजारांची वाढ झाली आहे.
RTO Revenue
RTO Revenue esakal

Nashik RTO Revenue : आकर्षक वाहन क्रमांक खरेदीकडे वाहनधारकांचा कल वाढत चालला असून, नोंदीतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महसुलात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत १ कोटी ७५ लाख ८१ हजारांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत एकूण १० कोटी ४३ लाख २६ हजार ५०० रुपये महसुल जमा झाला आहे. या वर्षी ११ हजार ८०९ वाहनधारकांनी पसंती दाखविली आहे. (Nashik 11 crore revenue to RTO from an attractive number marathi news)

प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणी, परवाना व नूतनीकरणासह व्यवसाय कर व पर्यावरण कर या माध्यमातून महसूल जमा होत असतो. तसेच आकर्षक नोंदणी क्रमांक विक्रीतूनही महसूल मिळत असतो. या क्रमांक खरेदीकडे वाहनधारकांचा कल वाढलेला आहे. मागील आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ ला आकर्षक वाहन क्रमांक नोंदीतून कार्यालयास ८ कोटी ६७ लाख ४५ हजार रुपये महसूल जमा झाला.  (latest marathi news)

RTO Revenue
Nashik Revenue Office : महसूल कार्यालयात खासगी वाहनांना प्रवेश बंदी

या वर्षी ,१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत तब्बल १० कोटी ४३ लाख २६ हजार ५०० रुपये महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन क्रमांक नोंदीतून १ कोटी ७५ लाख ८१ हजार ५०० रुपयांनी महसुलात वाढ झाली आहे. तसेच मागील वर्षी १०४१५ तर या वर्षी ११८०९ वाहन धारकांनी पसंती दाखविली आहे.

आकर्षक वाहन क्रमांक घेण्यात वाहनधारकांचा कल हा दिवसागणिक वाढत चालला आहे. मागील वर्षी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत दुचाकी ४०३९, तर चारचाकी व मालवाहतूक ६३७६ होती. तर या वर्षी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत दुचाकी ४२७२, तर चारचाकी व मालवाहतूक ७५३७ वाहनधारकांनी पसंती दाखविली आहे. एकंदरीत मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी आकर्षक वाहन क्रमांक घेण्यात वाहनधारकांचा कल वाढलेला दिसतो.

RTO Revenue
Nashik RTO Revenue : ‘आरटीओ’ला 367 कोटींचा महसूल! वर्षभरात 1 लाख 1 हजार 619 वाहनांची नोंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com