नाशिक: सातपूर येथील अशोकनगर येथे शनिवारी (ता. २) सायंकाळी खासगी क्लासच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या मारहाणीत १६ वर्षीय यशराज गांगुर्डे या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. रविवारी (ता. ३) यशराजच्या शवविच्छेदन अहवालानंतर मारहाणीमुळे अंतर्गत जखमा व रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.