
नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. शुक्रवार (ता. २४) ते रविवार (ता. २६)दरम्यान जादा बसगाड्या उपलब्ध असतील. यात्रेसाठी १६५ जादा बसगाड्या जिल्ह्यातील तालुक्यांतून त्र्यंबकेश्वरच्या मार्गावर धावणार आहेत.