Nashik News : पहिल्‍याच दिवशी 168 अर्ज विक्री! नाईक शिक्षण संस्‍था निवडणूक

Nashik News : क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा इच्‍छुकांची संख्या उदंड असल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे.
Naik Education Institute Election
Naik Education Institute Election esakal

Nashik News : क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा इच्‍छुकांची संख्या उदंड असल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे. कार्यकारी मंडळ २९ सदस्‍यांचे असताना पहिल्‍याच दिवशी तब्‍बल १६८ अर्जांची विक्री झाली आहे. त्‍यामुळे आता तीन पॅनल उभे राहाता की चार असा प्रश्‍न उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. (168 applications sold on first day Naik Education Institute Election)

मंगळवार (ता.९) पर्यंत अर्ज विक्री व स्‍वीकृतीची मुदत असल्‍याने दाखल अर्जांची संख्या विक्रमी ठरण्याची चिन्‍हे आहेत. क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत शनिवारी (ता.६) पहिल्या दिवशी १६८ नामनिर्देशन पत्र विक्री झाले आहेत. अर्ज नेणाऱ्या उमेदवारांमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

यापूर्वी पंचवार्षिक निवडणुकांमध्ये साधारणतः दोन पॅनल तयार व्‍हायचे. परंतु यंदा कधी नव्‍हे ते इच्‍छुकांची संख्या उदंड असल्‍याचे समोर येते आहे. त्‍यामुळे तीन ते चार पॅनल तयार होण्याची दाट शक्‍यता निर्माण झालेली आहे. अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी आणखी तीन दिवस मुदत असल्‍याने मोठ्या प्रमाणात नामनिर्देश पत्र विक्री होण्याची शक्‍यता आहे.

असे असले तरी प्रत्‍यक्षात किती अर्ज दाखल होतात व किती अर्ज छाननीअंती पात्र ठरविले जातात, हे समोर आल्‍यानंतर पॅनल उभारणी संदर्भातील अधिक चित्र स्‍पष्ट होऊ शकणार आहे. सध्या तरी इच्‍छुकांकडून प्रमुख पदाधिकारी, नेते मंडळीच्‍या गाठीभेटी घेत आपल्‍या उमेदवारीसाठी दावेदारी केली जाते आहे. सध्या नाराजी नको म्‍हणून सर्वांना आश्‍वासन दिले जात असल्‍याने नेमके कुणाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, हे देखील पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे. (latest marathi news)

Naik Education Institute Election
Nashik Police Recruitment Written Test : पोलीस भरतीची आज लेखी परीक्षा! शहराची KTHM तर ग्रामीणची भुजबळ नॉलेज सिटीत

दहा नामनिर्देशपत्र दाखल

एकीकडे मोठ्या संख्येने नामनिर्देशपत्र विक्री झालेले असताना, पहिल्‍या दिवशी विविध पदांसाठीचे दहा अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये अध्यक्षपदासाठी अशोक कराड यांनी तर सहचिटणीस पदासाठी पांडुरंग आव्‍हाड यांनी अर्ज दाखल केला आहे. विश्‍वस्‍त पदासाठी अशोक कराड, महिला राखीवकरिता विजया कराड यांचा अर्ज दाखल झाला आहे.

तालुकास्‍तरावरील सदस्‍यपदाकरिता गोपीनाथ बोडके आणि माणिक बोडके (दिंडोरी), झिप्रू ताडगे आणि रविकिरण डोमाडे (नांदगाव), उत्तम कातकाडे (निफाड), आणि भारत शेळके (सिन्नर) यांनी अर्ज दाखल केले आहेत.

Naik Education Institute Election
Nashik ZP News : जिल्हा परिषदेचा 46 टक्के निधी खर्च! निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com