Railway News : ‘स्मार्ट तिकिटा’ तून रेल्वेला 2 कोटीचा महसूल; विविध रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम

Nashik News : मनमाड, इगतपुरी, नाशिक रोडचा समावेश असलेल्या भुसावळ विभागातील बहुतांश प्रवाशांनी स्मार्ट तिकिटाचा पर्याय निवडला आहे.
2 crore revenue to Railways from Smart Ticket
2 crore revenue to Railways from Smart Ticketesakal

Nashik News : मनमाड, इगतपुरी, नाशिक रोडचा समावेश असलेल्या भुसावळ विभागातील बहुतांश प्रवाशांनी स्मार्ट तिकिटाचा पर्याय निवडला आहे. अनारक्षित तिकीट प्रवाशांचा वेळ वाचावा आणि प्रवाशांना रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून दिलासा मिळावा यासाठी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोडसह विविध रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. (2 crore revenue to Railways from Smart Ticket)

वाणिज्य रेल्वे कर्मचाऱ्यांनी युटीएस ॲप वापरण्याच्या मोहिमेचा परिणाम म्हणून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत एकूण ८ लाख ५९ हजार स्मार्ट प्रवासी तिकिटे जारी केली आहेत. यामधून एकूण २ कोटी रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. भुसावळ विभागातील नाशिक रोड.

मनमाड, इगतपुरीसह सर्व स्थानकांवर ऑनलाइन अनारक्षित रेल्वे तिकीट बुकिंगसाठी यूटीएस ऑन मोबाईल ॲप सुविधा उपलब्ध आहे. डिजिटल तिकीट मोडला प्रोत्साहन देणे, सेल्फ-तिकीटिंगला प्रोत्साहन देणे आणि प्रवाशांना रांगेचा त्रास न होता तिकीट खरेदी करता यावे हा त्यामागील उद्देश आहे. (latest marathi news)

2 crore revenue to Railways from Smart Ticket
Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या ‘सुपर फिफ्टी’तील 7 विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण

पेपरलेस प्रवास तिकिटे, सीझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट थेट मोबाईल यूटीएस ॲपद्वारे बुक करू शकतात. बुक केलेली तिकिटे ॲपमध्ये पाहिली जाऊ जातात. त्यामुळे हार्ड कॉपीची आवश्यकता नाही, अशी ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मुंबईच्या दिशेने जाणारे आणि मुंबईहून निघणारे प्रवासी आता यूटीएस ॲप तिकिटांद्वारे सीझन तिकीट बुक करत आहेत.

सीझन तिकीट प्रवासी धारक युटीएस मोबाईल ॲपद्वारे मासिक, अर्ध-वार्षिक आणि वार्षिक सीझन तिकीट खरेदी करू शकतात. यूटीएस ॲपमध्ये समाविष्ट केलेली नवीन वैशिष्ट्ये प्रवाशांना या डिजिटल ॲपकडे आकर्षित करत आहेत. भुसावळ विभागाने अनारक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोबाईल तिकीट ॲपवर यूटीएसच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.

2 crore revenue to Railways from Smart Ticket
Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या गलथान कारभाराचा ‘निर्मल वारी’ला फटका; साडेपाच कोटींचा प्रस्ताव रद्द होण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com