Nashik News : सावरकर नगरमध्ये बांधकामाची भिंत कोसळून 2 मजूर ठार; 2 मजूर जखमी

Nashik News : गंगापूर रोड परिसरातील सावरकर नगरमध्ये नव्याने बंगल्याचे बांधकामासाठी पाया भरणीची भिंत कोसळली अन...
An unfortunate incident has taken place at the same construction site in Savarkarnagar
An unfortunate incident has taken place at the same construction site in Savarkarnagar esakal

Nashik News : गंगापूर रोड परिसरातील सावरकर नगरमध्ये नव्याने बंगल्याचे बांधकामासाठी पाया भरणीची भिंत कोसळली. या भिंतीच्या ढिगार्याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यु झाला तर, दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिसात संबंधित बांधकाम ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदा आहेर यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू असताना सोमवारी (ता. ८) सकाळी ही दूर्घटना घडली आहे. (Nashik 2 laborers killed in construction wall collapse in Savarkar Nagar news)

गोकुळ संपत पोटिंदे (२८), प्रभाकर काळू बोरसे (३७, दोघे रा. दरी, ता. नाशिक) असे मयत मजुरांची नावे आहेत. तर, अनिल रामदास जाधव (३०, रा. दरी), संतोष तुकाराम दरोगे (४५, रा. काळेनगर) असे जखमी मजुरांची नावे असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड परिसरातील सावरकर नगर येथील शारदा नगरमध्ये भाजपाचे पदाधिकारी केदा आहेर यांच्या नूतन बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. सदरील बंगल्याचे बांधकाम ठेकेदार मनोज चव्हाण हे करीत आहेत. बंगल्याच्या पाया घेण्यासाठी खोल खड्डा करण्यात आला आहे.

तसेच, खड्ड्यात उभ्या भिंती उभारण्याचे काम सुरू होते. चार दिवसांपूर्वी एका बाजुकडे सुमारे १० फुट उंच भिंत उभारण्यात आलेली होती. सोमवारी (ता. ८) सकाळी साडेदहा - अकरा वाजेच्या सुमारास त्याच भिंतीलगत कामगार गोकूळ व प्रभाकर हे काम करीत होते तर दोन कामगार अनिल व संतोष हे लाकडी शिडीवरून विटा आणत होते.

त्याचवेळी सदरची भिंत गोकूळ व प्रभाकर यांच्या अंगावर कोसळली. विटांच्या ढिगार्याखाली दोघे दबले गेले. तर शिडीवरून विटा आणणारे दोघेही खड्ड्यात पडले. त्याठिकाणी असलेल्या मजुरांना आरडाओरडा केल्याने ढिगाऱ्या दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी कामगारांनी धाव घेतली.

अग्निशमन दलाचे पाचारण केले असता, जवानांनी ढिगार्यांखाली दबलेल्या व गंभीर जखमी असलेल्या दोघांना नजिकच्या श्री गुरुजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. तर दोघा जखमी कामगारांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच गंगापूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी बांधकाम ठेकेदाराविरोधात गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याच आला असून, पोलीस तपास करीत आहेत.

गंगापूररोड परिसरातील सावकरनगर येथील शारदा नगरात भाजप नेते केदा आहेर यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी सोमवारी (दि. ८) वाजता भिंत उभारणीचे काम सुरू होते. सकाळी साडेदहा वाजता अचानक भिंतीचा एक भाग कोसळला.  (latest marathi news)

An unfortunate incident has taken place at the same construction site in Savarkarnagar
Nagpur Accident: एका मागोमाग धडकल्या कार, दोघे जखमी; कोराडी महामार्गावर बघ्यांची एकच गर्दी

या दुर्घटनेत गोकुळ संपत पोटिंदे (वय २८), प्रभाकर काळू बोरसे (३७), अनिल रामदास जाधव (३०, तिघे रा. दरी) आणि संतोष तुकाराम दरोगे (४५, रा. काळे नगर) हे चौघे कामगार गंभीर जखमी झाले. यापैकी गोकुळ व प्रभाकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, सकाळी साडेदहा वाजता घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे या पथकासह दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनीही धाव घेत जखमी कामगारांना बाहेर काढले. चौघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दोघांचा मृत्यू झाल्यानंतर गंगापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तर दोन जखमी कामगारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.

मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शहरात शेकडो इमारती, बंगल्यांचे बांधकामे सुरू आहेत. सातत्याने काही ना काही दूर्घटना घडून मजुरांचा मृत्यु होत असतो. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल होतो. बांधकाम मजुरांना संरक्षण साहित्य पुरविणे बंधनकारक असताना बांधकाम ठेकेदारांकडून ते पुरविले जात नाही.

परिणामी हकनाम मजुरांना जीवमुठीत घेऊनच काम करावे लागते आहे. याकडे कोणत्याही प्रशासकीय विभागाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने केवळ गुन्हा दाखल होऊन त्याचठिकाणी प्रकरण थांबते. यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतो आहे.

An unfortunate incident has taken place at the same construction site in Savarkarnagar
Accident News: संभाजीनगर-जळगाव महामार्गावरती भीषण अपघात; वाहतुकीवर परिणाम, १० किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com