Nashik ZP News : 2 वर्षांचा निधी 8 दिवसांत खर्च; जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाची तत्परता

Nashik ZP : 2 वर्षांचा निधी 8 दिवसांत खर्च; जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाची तत्परता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शाळा, खोल्या बांधकामासाठी जिल्हा नियोजनकडून निधी प्राप्त झाला.
Funding
Fundingesakal

Nashik ZP News : 2 वर्षांचा निधी 8 दिवसांत खर्च; जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाची तत्परता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शाळा, खोल्या बांधकामासाठी जिल्हा नियोजनकडून निधी प्राप्त झाला. मात्र, दोन वर्षे उलटूनही हा निधी खर्च होईना. त्यामुळे ३१ मार्चला १५.७२ कोटींचा निधी अखर्चित दिसत होता. मात्र, अखर्चित निधी खर्चासाठी मुदत मिळाल्याने शिक्षण विभागाने आठ दिवसांत यातील ७० टक्के निधी खर्च केला असल्याचे समोर आले आहे.

निधी खर्चासाठी दोन दिवस शिल्लक असून, यात १० टक्के निधी खर्च होणार असल्याचा दावा विभागाने केला. त्यामुळे आठ दिवसांत निधी खर्च होऊ शकतो तर, दोन वर्षांपासून निधी नेमका का पडून होता, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी खर्च करण्यासाठी दोन आर्थिक वर्षांची मुदत असते. या मुदतीत खर्च न झाल्यास तो निधी संबंधित यंत्रणांना परत करावा लागतो.

जिल्हा नियोजन समितीकडून २०२२-२३ या वर्षात प्राप्त झालेल्या ५५० कोटींच्या निधीतून ६५ कोटी रुपये अखर्चित राहिले (३१ मार्चपर्यंत) असून, ते जिल्हा कोशागारात जमा करावे लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या अखर्चित निधीत प्रामुख्याने प्राथमिक शिक्षण विभागाचा सर्वाधिक १५.७२ कोटी निधीचा समावेश होता. शिक्षण विभागाला ६९.९७ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असताना त्यातील १५.७२ कोटी रुपये निधी परत करावा लागणार होता. (latest marathi news)

Funding
Nashik ZP News : जि. प. चा निधी खर्चाचा टक्का घसरला!

यामुळे पुढील वर्षी प्राप्त होणाऱ्या निधीपैकी १५.७२ कोटी रुपये निधी या अपूर्ण कामांवर खर्च करावा लागणार आहे. एकीकडे शेकडो शाळांना वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थ्यांना जुन्या, धोकादायक शाळांमध्ये बसवून शिकवावे लागत असताना निधी वेळेत खर्च करण्याबाबत जिल्हा परिषद यंत्रणा उदासीन असल्याचे दिसत असल्याचा आरोप झाला. शिक्षणसह विविध विभागांच्या अखर्चित निधीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ बैठक घेत आढावा घेतला.

यात शिक्षण व बांधकाम विभागात समन्वय नसल्याचे दिसून आले होते. यातच निधी खर्चासाठी ३१ मार्चची असलेली मुदत १२ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे शिक्षण विभागाने हा शिल्लक निधी खर्चासाठी तातडीने पावले उचलली. बांधकाम विभागाशी समन्वय साधून, कामे मार्गी लावण्यासाठी धडपड केली. यात झालेल्या कामांची देयकेही सादर करण्यात आली.

त्यामुळे बुधवारपर्यंत (ता. १०) अखर्चित निधीपैकी तब्बल ७० टक्के निधी खर्च झाला असल्याचे सांगण्यात आले. खर्चासाठी अद्यापही दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने आणखी काही कामांची देयके सादर होणार असल्याचे सांगण्यात आले. निधी खर्चासाठी असलेली शिक्षण विभागाची ही तत्परता आधी म्हणजे दोन वर्षे का दाखविली गेली नाही. गत आठ दिवसांतच असे काही घडले, की इतक्या तत्परतेने निधी कसा खर्च झाला, असा सवाल उपस्थित होत आहे.

Funding
Nashik ZP News : जि. प. कर्मचारी बँकेस 2 कोटी 15 लाखाचा नफा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com