
नाशिक : जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदी असताना सर्रास विक्री सुरूच आहे. यामुळे जिल्ह्यातील सिन्नर, येवला, मालेगाव, चांदवड या ठिकाणी अनेक जण जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या नायलॉन मांजाविरोधात जिल्ह्यात २० गुन्हे दाखल असून, सर्वाधिक १३ गुन्हे सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तसेच, याच शहरात नायलॉन मांजामुळे जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.