Nashik News: जिल्हातील धरणांमध्ये 22 टक्क्यांनी कमी पाणीसाठा! मागील वर्षी 46,943; यंदा 32,390 दशलक्ष घनमीटर साठा

Water Crisis : नाशिक जिल्हातील धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून, मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल २२ टक्क्यांपेक्षा जास्त साठा कमी झाला आहे.
Dam Water File Photo
Dam Water File Photoesakal

लखमापूर : नाशिक जिल्हातील धरणाच्या (Dam) पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून, मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल २२ टक्क्यांपेक्षा जास्त साठा कमी झाला आहे. मागीवल वर्षी असलेला ४६,९४३ दशलक्ष घनमीटर साठा यंदा ३२,३९० दशलक्ष घनमीटरवर आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Nashik water storage in dams in district marathi news)

गंगापूर धरण समूहातील गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी व आळंदी या धरणांतील साठा समाधानकारक असला, तरी मागील वर्षापेक्षा पाच टक्क्यांनी कमी झाला आहे. इतर धरणांतील साठा मोठ्या प्रमाणात कमी जाणवत आहे. मागील वर्षी पावसाने मोठी उसंत दिली. शेवटच्या काही दिवसांत पडलेल्या पावसाने अनेक धरणांनी शंभरी गाठली.

मात्र, ती तितक्या गतीने कमी झाली. फेब्रुवारीच्या मध्यावर जिल्ह्यातील २४पैकी १३ धरणांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. (Latest Marathi News)

Dam Water File Photo
Nashik Water Crisis: विहिरींनी गाठलायं तळ, पाण्याचा बसेना मेळ! राजापूरला तीव्र पाणीटंचाई, टँकरची संख्या वाढविण्याची मागणी

१२ फेब्रुवारीअखेर धरणांतील साठा

धरण २०२३ २०२४

गंगापूर ७८.४४ ६४.७८

काश्यपी ९३.२० ९२.८२

गौतमी गोदावरी ४४.२२ ६२.७९

आळंदी ६९.४९ ६२.६२

पालखेड ५९.७२ ३०.४७

करंजवण ७०.२१ ४७.३१

वाघाड ५३.०४ ३०.८९

ओझरखेड ७२.६८ ४४.४१

पुणेगाव ६५.८१ ५२.१७

तीसगाव ५७.८० २८.५७

दारणा ७३.८७ ४८.७६

भावली ९३.३८ ४०.७३

मुकणे ८५.१४ ५१.८४

वालदेवी ८७.५६ ८६.८५

कडवा ४६.४५ ३६.७३

नांदूरमध्यमेश्वर ८५.६० ८९.११

भोजापूर ४६.५४ १७.७३

चणकापूर ९५.२२ ५०.३५

हरणबारी ७५.७३ ६०.८१

केळझर ७३.०८ ४७.९०

नागासाक्या ४७.३६ ००.००

गिरणा ६३.०५ ३९.९९

पुनंद ९५.३३ ८३.१५

माणिकपुंज ४४.१८ २३.५८

एकूण ७१.४९ ४९.३३

Dam Water File Photo
Nagpur Water Crisis: नागपूरकरांनो, पाणी वापरा जपून! तोतलाडोह व कामठी-खैरी प्रकल्पांची पातळी खोलात, करा 'या' उपाययोजना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com