Nashik News : ओझरला 27 नळकनेक्शन खंडित! नगरपरिषदेची थकबाकीदारांवर कारवाई; करवसुली मोहीम जोरात

Nashik News : नगरपरिषद हद्दीत मार्च एन्डजवळ येत असल्याने थकीत करवसुली मोहिमेला वेग आला आहे.
Renuka Patil, Aishwarya Bairagi, Avinash Gawle, Anil Borse etc. during tax collection.
Renuka Patil, Aishwarya Bairagi, Avinash Gawle, Anil Borse etc. during tax collection. esakal

ओझर : नगरपरिषद हद्दीत मार्च एन्डजवळ येत असल्याने थकीत करवसुली मोहिमेला वेग आला आहे. नगरपरिषद वर्षभर सेवा देऊनही अनेक नागरिक कर भरण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी ‘ॲक्शन मोड’वर आले असून, आतापर्यंत २७ थकबाकीदारांचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई झाली आहे. नळतोडणीसह या पुढील टप्प्यात मालमत्ता सील करणे, नावे जाहीर करणे यासारखी मोहीम राबविण्यात येणार आहे. (Nashik 27 pipe connections broken to Ozar Municipal Council marathi news)

दरवर्षी करवसुली आणि विविध माध्यमातून मिळणारे उत्पन्न पालिकेचा वर्षाचा गाडा हाकण्यासाठी हक्काचा फंड (निधी) असतो. शहराचा झपाट्याने विस्तार वाढला असून, नगरपालिकेने शहरात विभागनिहाय वसुली पथक नेमले आहेत.

नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच वर्षभराची मालमत्ता कर व पाणीपट्टी, गाळे भाडेपट्टीच्या पावत्यांचे वाटप करूनही थकबाकीदार प्रतिसाद देत नसल्याने मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना विभागाच्या रेणुका पाटील, ऐश्वर्या बैरागी, अविनाश गवळे, करनिरीक्षक अनिल बोरसे, नगररचनाकार केऊर रॉय, कैलास जाधव, संतोष सोनवणे, हर्शल पगार, राजेश संकपाळ, योगेश घेगडमल आदींचे पथक वसुलीसाठी तैनात केले आहे. (Latest Marathi News)

Renuka Patil, Aishwarya Bairagi, Avinash Gawle, Anil Borse etc. during tax collection.
NMC News: अधिकाराचे पत्र घेऊन कामगार उपायुक्त महापालिकेत; मराठी पाट्यांसाठी उद्यापासून आस्थापनांवर कारवाई

१ मार्चपासून मुख्याधिकारी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धडक करवसुली मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात सत्तावीसहून अधिक नळकनेक्शन तोडले असून, प्रतिसाद न देणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांवर यापुढे नळकनेक्शन तोडणी, मालमत्ता सील, थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजावण्याचे आंदोलनही सुरू होणार आहे. शंभर टक्के करवसुलीचे उद्दिष्ट न गाठल्यास पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान रोखण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

"शासनाने गाळा भाडे पाणीपट्टी तसेच विविध प्रकारच्या मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिल्याने त्यावरच नगरपरिषदेच्या विविध निधीचे गणित अवलंबून असते. शिवाय, शहराच्या विविध गरजाही या निधीतून भागवायच्या असतात. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरून सहकार्य करावे व कटु कारवाई टाळावी."

- किरण देशमुख, मुख्याधिकारी, ओझर नगरपरिषद

Renuka Patil, Aishwarya Bairagi, Avinash Gawle, Anil Borse etc. during tax collection.
Nashik Water Crisis: अन्न-पाण्यासाठी झुंजणाऱ्या काळविटांना ठिबकच्या नळ्यांचा फास! चांदवडच्या कातरवाडीतील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com