
नाशिक : केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लॅस्टिक बंदी वरून महापालिकेचे कान टोचल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करताना वर्षभरात ५५७ दुकानदार, नागरिकांकडून २८ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकल प्लॅस्टिकचा वापर, विक्री व साठ्यावर बंदी घातली आहे. एकल प्लॅस्टिकचा वापर, विक्री व साठा करणाऱ्यांवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दंड आकारला जातो.