Nashik News : नांदगावच्या शिवसृष्टीचे काम अंतिम टप्प्यात! 29 फुटाचा अश्‍वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा दाखल

Nashik : शिवकालीन इतिहास, संस्कृती व पारंपारिक वारसा आणि अनुभव असा एकत्रित प्रतिबिंबित सौंदर्यानुभव देणाऱ्या येथील शिवसृष्टीचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
The ongoing work of Shiv Srishti, which is taking shape from the concept of MLA Suhas Kande, is on a war footing. In the second photo, the historic event on the protective wall.
The ongoing work of Shiv Srishti, which is taking shape from the concept of MLA Suhas Kande, is on a war footing. In the second photo, the historic event on the protective wall.esakal

Nashik News : शिवकालीन इतिहास, संस्कृती व पारंपारिक वारसा आणि अनुभव असा एकत्रित प्रतिबिंबित सौंदर्यानुभव देणाऱ्या येथील शिवसृष्टीचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, ऐतिहासिक शिवकालीन भव्य-दिव्यतेची प्रचिती आणून देणारे स्फूर्तीदायक प्रसंग असे सर्व काही भव्य-दिव्य घेऊन आमदार सुहास कांदे यांच्या संकल्पनेतील आकाराला येत असलेल्या शिवसृष्टीचे काम अतिशय युद्धपातळीवर सुरु असून, विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शिवसृष्टीचे लोकार्पण नजीकच्या काळातच होण्याची शक्यता दिसू लागली आहे. (29 foot statue of Shivaji Maharaj on horseback was introduced )

शहरात प्रवेश करता क्षणी मालेगाव रस्त्यावर जुन्या पंचायत समितीच्या आवारात अडीच एकरातील हा प्रकल्प सौंदर्यात चार चॉंद लावणारा ठरला आहे. वीस फुटाच्या चौथऱ्यावर २९ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा अश्‍वारूढ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा देखणा पुतळा, यासह साकारण्यात येणारी नांदगावची ही शिवसृष्टी आशिया खंडातील एकमेव ठरावी, यासाठी उत्तर प्रदेश, राजस्थानमधील कारागिरांची अहोरात्र मेहनत सुरु आहे.

शुक्रवारी एकोणतीस फुटाचा महाराजांचा पुतळा धुळे येथून नांदगावला कार्यस्थळी दाखल झाला असून, पुतळ्याचे असेंब्लिंग सध्या सुरु आहे. शिवसृष्टीचे प्रवेशद्वार देखील भव्यदिव्य असून, शिवसृष्टीच्या संरक्षक भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनकथा साकारली जाणार आहे. या संरक्षक भिंतीवरील म्युरल्स साकारण्याच्या कामाची देखील लगबग आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या म्युरल्स चित्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या कथा पाहायला, वाचायला व अनुभवायला मिळणार आहे.

त्यासोबत शिव संग्रहालयाच्या माध्यमातून शिवकालीन हत्यारे, शिवकालीन वस्तू पाहायला मिळणार आहे. यामुळे भावी पिढीला स्वराज्याचा इतिहास जवळून पाहता येईल आणि समजून घेता येईल. याच्या जोडीला शिव वाचनालय उभारण्यात येणार असून, त्यात शिवकालीन ग्रंथ वाचायला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिवसृष्टी पाहायला येणाऱ्या शिवप्रेमींसाठी येथे शिवभोजनालयाची व्यवस्था करून दिली जाणार आहे. (latest marathi news)

The ongoing work of Shiv Srishti, which is taking shape from the concept of MLA Suhas Kande, is on a war footing. In the second photo, the historic event on the protective wall.
Nashik News : नोकरी संदर्भात बनावटी नियुक्ती पत्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल; सावध राहण्याचे महानिर्मितीचे आवाहन

‘शिव चित्रपटगृह’ या संकल्पनेच्या माध्यमातून एक मिनी थिएटर याठिकाणी असणार आहे. या शिव चित्रपटगृहात ऐतिहासिक चित्रपटांचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य व आरमारासंदर्भात प्रेरणा देणारे प्रसंग, उद्यान, व्यायामाची साधने, अम्पी थिएटर, जॉगिंग ट्रक आदी सुविधा या शिवसृष्टीत असणार आहेत. शिवसृष्टीचे प्रवेशद्वार, त्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा २९ फूट उंचीचा पूर्णाकृती ब्राँझ धातूतील अश्‍वारूड पुतळा व त्यासभोवताली कारंजासह नैसर्गिक हिरवळीचे देखणे उद्यान या अन्य कामांना देखील गती मिळाली आहे.

शिवसृष्टी बनणार शक्तिस्थळ

आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव मतदारसंघातील शिवप्रेमी जनतेला हा अनोखा नजराणा मिळाला आहे. शिवसृष्टीसाठी राज्याच्या पर्यटन विभागाने आतापर्यंत बारा कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून, उर्वरित तेरा कोटी रुपये नजीकच्या काळात उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक स्मृती जतन होण्यासोबत भविष्यातील ते शक्तिस्थळ बनावे, अशी आमदार सुहास कांदे यांची धारणा आहे. त्यामुळे नियोजित शिवसृष्टी ही देखील नांदगावकरांना मोठी भेट असणार आहे.

''केवळ राज्यातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात उंच ब्रांझ धातूतील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा हे या शिवसृष्टीचे वैशिष्ट्ये असून, शिवप्रेमी जनतेला दिलेला शब्द प्रत्यक्षात खरा करून दाखविला, याचा मनस्वी आनंद आहे.''- सुहास कांदे, आमदार, नांदगाव

The ongoing work of Shiv Srishti, which is taking shape from the concept of MLA Suhas Kande, is on a war footing. In the second photo, the historic event on the protective wall.
Nashik News : ‘कृषी’च्‍या थेट द्वितीय वर्षाच्‍या प्रवेशअर्जाची बुधवारपर्यंत मुदत; प्रवेशफेऱ्यांचे वेळापत्रक जारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com