

जुने नाशिक : काझी गढीच्या काठावरील तीन घरे कोसळल्याची घटना शनिवारी (ता. १४) दुपारी घडली. चौथ्या घरास तडा गेल्याने गढी आणखी धोकादायक झाली आहे. कधीही कोसळण्याची शक्यता आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घरातील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचा सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. धोकादायक काझी गढीने शनिवारी पुन्हा रहिवाशांच्या काळजाचा ठोका उडविला. (3 houses on Kazi gadhi collapse )