Swine Flu : स्वाईन फ्ल्यूचे 3 रुग्ण; एकाचा मृत्यू, दोघे ठणठणीत

Nashik News : सिन्नर तालुक्यातील दातली येथील ६३ वर्षी महिलेचा नाशिकमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला तर त्या व्यतिरिक्त आणखी दोन स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले.
Swine Flu
Swine Flu esakal

Nashik News : स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव जवळपास संपल्यात जमा झाल्याच्या चर्चा सुरु असतानाच सिन्नर तालुक्यातील दातली येथील ६३ वर्षी महिलेचा नाशिकमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला तर त्या व्यतिरिक्त आणखी दोन स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले. त्या दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली. (Nashik 3 patients of swine flu)

एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत शहरातील सुमारे चार लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली तर चार हजारांहून अधिक रुग्णांचा या आजाराने बळी घेतला. सन २०२२ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नाशिककरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा केरळमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळला.

पाठोपाठ नाशिकच्या ग्रामिण भागातही कोरोना रुग्ण आढळला. कोरोनाचा चौथ्या लाटेतील पहिला रुग्ण आढळल्याने नाशिक महापालिकेसह मालेगाव महापालिका, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा उपरुग्णालय, डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेज, एसएमबीटी कॉलेजच्या प्रमुखांची जिल्हा शल्य चिकित्सकांनी बैठक घेत कोरोना तयारीचा आढावा घेतला. (latest marathi news)

Swine Flu
Nashik Onion News : जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची चौकशी; बेकायदा लिलावचा आरोप

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राखीव बेड, आॉक्सिजन व्यवस्था तसेच औषधसाठा सज्ज केला. त्यानंतर मात्र कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. परंतू अचानक शहरात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले. पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठविलेल्या स्वॅबनुसार दोन्ही रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. यात सिन्नरमधील दातली येथील एका ६३ वर्षीय महिलेचा शहरातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

"शहरात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आहेत. त्या व्यतिरिक्त एक रुग्ण सिन्नरमधील असून महापालिका हद्दीत उपचारासाठी आले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला." - डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक, महापालिका.

Swine Flu
Nashik Dr. Ambedkar Jayanti Miravnuk : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करीत डीजेचा दणदणाट! पोलिसांकडून गुन्हे दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com