Ration Card : ‘आरसीएम’ प्रणालीमुळे 4200 रेशन कार्ड प्रलंबित; धान्य वितरण अधिकाऱ्यांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

Nashik News : विविध कारणांनी धान्य वितरण कार्यालयाकडे सहा महिन्यांत दाखल झालेल्या रेशन कार्डपैकी ४२०० कार्ड रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणालीमुळे (आरसीएमएस) रखडले आहेत.
Ration Card
Ration Cardesakal

Nashik News : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी महिलांची झुंबड उडालेली असताना दुसरीकडे विविध कारणांनी धान्य वितरण कार्यालयाकडे सहा महिन्यांत दाखल झालेल्या रेशन कार्डपैकी ४२०० कार्ड रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणालीमुळे (आरसीएमएस) रखडले आहेत. (4200 ration card pending due to RCM system)

यासंदर्भात जिल्ह्याचे धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. धान्य वितरण अधिकारी कार्यालयामार्फत रेशन कार्ड ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने नोंदविले जाते. तसेच रेशन कार्डमधील व्यक्तींचे नाव कमी करणे अथवा त्यात समाविष्ट करण्याची कामे होतात.

रेशन कार्डची ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर संबंधित व्यक्तींना धान्य वितरित केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी केंद्र स्तरावर ‘आरसीएमएस’ ही एकच ऑनलाइन प्रणाली वापरात येत आहे. त्यामुळे प्रणाली अत्यंत संथगतीने काम करते. दिवसभरात एक कर्मचारी दहा ते १२ अर्ज ऑनलाइन नोंदवू शकतात. त्यामुळे या कार्यालयाकडे जानेवारी ते जून २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीतील ४२०० अर्ज प्रलंबित राहिले आहेत.

त्यातील ५० टक्के अर्ज हे रेशन कार्डची नोंदणी ऑनलाइन करण्यासंदर्भातील आहेत. उर्वरित नाव कमी किंवा नोंदणी संदर्भातील आहेत. या कार्डचा मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेशी काहीही संबंध नसला तरी कर्मचाऱ्यांच्यांवर कामाचा अतिरिक्त भार येत असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले. कार्यालयात फक्त ९ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (latest marathi news)

Ration Card
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

तीन दिवसांत १२७ अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे किंवा कमी करण्यासंदर्भात गेल्या तीन दिवसांत १२७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ६५ अर्ज धान्य वितरण कार्यालयाने निकाली काढले आहेत. सोमवारी ६२ अर्ज दाखल झाल्यामुळे ते मंगळवारी निकाली निघणार असल्याचे तहसीलदार जाधव यांनी सांगितले.

‘आरसीएमएस’मधील अडचणी

- या प्रणालीवरुन दररोज अवघ्या दहा ते १५ लाभार्थ्यांची एन्ट्री होते

- लॉगीन करताना ओटीपी प्राप्त न होणे

- ओटीपी आल्यानंतर लॉगईन होण्यासाठी सात ते दहा मिनिटांचा अवधी लागतो

- संकेतस्थळ अत्यंत संथगतीने काम करते

- रात्री ८ ते सकाळी १० यावेळेत ही प्रणाली व्यवस्थित चालते

- आधार सर्च डेक्सवर ॲप्लिकेशन क्रमांक दिसत नाही

- प्रणालीत नल रिस्पॉन्स फ्रॉम आधार, प्लीज ट्राय अगेन, सर्व्हेस अनअव्हाईलेबल, एचटीटीपी एरर दाखवते

- आरसीआयडी क्रमांक दाखल केल्यानंतर आधार ओटीपी येत नाही

- डिजिटल शिधापत्रिकेची प्रिंट डाऊनलोड होत नाही

- परिणामी नागरिक दिवसभर कार्यालयात गर्दी करतात

Ration Card
Nashik ZP News : यंदाच्या सुपर 50 उपक्रमात 110 विद्यार्थ्यांना संधी; 21 जुलै रोजी होणार निवड चाचणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com