
नाशिक : जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात पाइपलाइनच्या ८०० योजना पूर्ण झाल्या आहेत. यातील ७३३ योजनांमधून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, ४२२ योजनांची कामे अजूनही रखडली आहेत. त्यांना निधीच उपलब्ध होत नसल्याने ही कामे मार्चअखेर पूर्ण कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत जलजीवन योजनेच्या पूर्ण झालेल्या कामांचे १०० कोटी रुपये थकीत आहेत.