esakal | नाशिक: सीए अंतिम परीक्षेत आगम देशात '४६' वा
sakal

बोलून बातमी शोधा

agam shaha

नाशिक: सीए अंतिम परीक्षेत आगम देशात '४६' वा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक: द इन्‍स्‍टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय)तर्फे झालेल्‍या परीक्षांचे निकाल सोमवारी (ता. १३) जाहीर झाले. अंतिम परीक्षेत नाशिकच्‍या आगम शहा याने राष्ट्रीय क्रमवारीत ४६ व्‍या क्रमांकासह यश मिळविले. अंतिम परीक्षेसोबत फाउंडेशन परीक्षेतही नाशिकच्‍या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.

हेही वाचा: सण-उत्सवांमुळे नाशिकमध्ये रिअल इस्टेटला बुस्ट

सीए अंतिम परीक्षेत नाशिकच्‍या श्‍वेतांक पाटील याने पहिल्‍या प्रयत्‍नात यश मिळविले. प्रथमेश लोहारकर, अनुराज ढोबळे यांच्‍यासह खुशबू बुरड, वैष्णवी शिंदे, ओमकार सोनवणे, किरण वाझट, गोपिका मगजी, साक्षी गायकवाड यांनीही यश मिळविले. सीए फाउंडेशनच्‍या परीक्षेस देशभरातून ७१ हजार ९६७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी १९ हजार १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णाचे प्रमाण २६.६२ टक्‍के आहे.

सीए अंतिम परीक्षेत (फायनल) पहिल्‍या ग्रुपसाठी ४९ हजार ३५८ विद्यार्थ्यांपैकी नऊ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. हे प्रमाण २०.२३ टक्‍के राहिले. ग्रुप दोनमध्ये ४२ हजार २०३ विद्यार्थ्यांपैकी सात हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण १७.३६ टक्के आहे, तर दोन्‍ही ग्रुपची परीक्षा एकाच वेळी २३ हजार ९८१ विद्यार्थ्यांनी दिली. यातून दोन हजार ८७० विद्यार्थ्यांनी यश मिळवत सनदी लेखापाल होण्याचे स्‍वप्‍न पूर्ण केले आहे. दोन्‍ही ग्रुप उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्‍केवारी ११.९७ इतकी आहे.

loading image
go to top