esakal | नाशिक : सण-उत्सवांमुळे रिअल इस्टेटला बुस्ट; २५०हून जास्त नवे प्रकल्प सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

real estate

सण-उत्सवांमुळे नाशिकमध्ये रिअल इस्टेटला बुस्ट

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शहरात सर्वाधिक उलाढाल होणाऱ्या रिअल इस्टेट व्यवसायाचे सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नव्याने उड्डाण होताना दिसतं आहेत. शहरात गेल्या काही महिन्यात तब्बल अडीचशेहून अधिक नवीन प्रकल्प सुरू झाल्याने शहराच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे.


कोरोनाची पहिली लाट मार्च महिन्यात आल्यानंतर तब्बल साडेतीन महिने लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. त्यात बांधकामांचा देखील समावेश होता. बांधकाम मजुरांनी लॉकडाऊनमुळे गावाकडचा रस्ता धरल्याने अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर देखील परिस्थिती पूर्वपदावर लवकर आली नाही. ऑक्टोबरपर्यंत कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून आला. जानेवारी महिन्यापर्यंत परिस्थिती सर्वसाधारण असताना या वर्षाच्या फेब्रुवारी महिनाअखेर पासून पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेने देखील दीड महिना लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. या सर्वांचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला. याच काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. त्यामुळे इमारती बांधूनही ग्राहक मिळेल कि नाही, अशी शंका होती. मात्र मे महिन्यानंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरतं असल्याने बांधकाम, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवसाय पुन्हा तेजीत आले आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तरी रिअल इस्टेट क्षेत्रातील तेजी मात्र कायम राहील, असा विश्‍वास बांधकाम व्यावसायिक व्यक्त करतं आहेत.

हेही वाचा: नाशिक : ११ वीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतही कट-ऑफ ९० टक्क्‍यांवरप्रकल्प पूर्णत्वाकडे कल

सध्या शहरात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरल्याचे दिसतं आहे. त्यात लांबणीवर पडलेले प्रकल्प गणेशोत्सवात सुरू झाल्याने बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्र-दसरा व त्यानंतर दिवाळीचा सण असल्याने बाजारात तेजीचे वातावरण राहिले. त्यापुढे देखील हाती घेण्यात आलेले प्रकल्प पूर्णत्वाकडे कल राहणार आहे. सध्या शहरात अडीचशे छोटे-मोठे प्रकल्प सुरू झाले आहे. आनंदवली, मखमलाबाद, पाथर्डी, नाशिक रोड, नाशिक शिवार या भागात अधिक प्रकल्प सुरू झाले आहेत.


पायाभूत सुविधांमुळे अर्थकारणाला गती

भविष्यात नाशिकमध्ये टायरबेस मेट्रो सुरू होणार आहे. शहरात दोन नवीन उड्डाणपूल तयार होत आहे. समृद्धी महामार्ग दिवाळीपर्यंत खुला होणार आहे. नाशिकहून देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारी हवाई सेवा सुरू झाली आहे. सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गामुळे सुरतचे अंतर अवघ्या दोन तासांवर येणार आहे. नाशिक रोड ते द्वारका उड्डाणपुलाचा समावेश भारतमाला प्रकल्पात करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्प सुरू होणार असल्याने अनेकांचा नाशिकमध्ये घर खरेदी करण्याकडे कल असल्याचा परिणाम देखील दिसून येत आहे.

हेही वाचा: गोदेची पातळी वाढली! गंगापूर, दारणा धरण समूहातून विसर्ग

loading image
go to top