Nashik News : 5 कोटींच्या दागिन्यांच्या शोधासाठी एकापेक्षा अधिक पथके

Nashik News : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरू असून एकापेक्षा अधिक पथके गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुंतलेली आहेत.
Police
Police esakal

Nashik News : थेट बँकेतील सेफ्टी लॉकरमधील सुमारे साडेतेरा किलोच्या ५ कोटी रुपयांच्या दागिने चोरीच्या गुन्ह्याचा कसून शोध सुरू आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरू असून एकापेक्षा अधिक पथके गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुंतलेली आहेत. (5 crore worth of jewellery More than one team to search)

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या शाखेतील सेफ्टी लॉकरमधील २२२ ग्राहकांचे सुमारे ५ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने दोघा चोरट्यांनी चोरून नेले आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी जयेश कृष्णदास गुजराथी (रा. खंडेरावनगर, पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, सरकारवाडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी (ता. ४) पहाटे सुमारास घडली आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक या गुन्ह्याचा उकल करण्यासाठी कसून तपास करीत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या दोघा संशयितांचा शोध घेतला जात आहेत. तसेच, संशयितांना शाखेच्या आतील लॉकरची पुरेशी माहिती असल्याने त्या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.

Police
Nashik Crime News : दीड महिन्यात साडेतीन कोटींचा अवैध मद्यसाठा, गुटखा जप्त; ग्रामीण पोलिसांची कारवाई

त्याचप्रमाणे, तांत्रिक विश्लेषणानुसार स्वतंत्र पथक गुन्हेगारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांची पथके गुन्ह्याच्या बारीकसारीक घटनांनुसार शोध आहेत.

संशयितांनी मॅनेजरच्या खिडकीतून आत प्रवेश केल्यानंतर सेफ्टी लॉकरच्या चाव्या मिळविल्या आणि २२२ ग्राहकांचे लॉकरमधील १३,३८५.५३ ग्रॅम सोन्याचे सुमारे ४ कोटी ९२ लाखांचे दागिने चोरून नेले.

"गुन्ह्याचा योग्य दिशेने तपास सुरू आहे. लवकरच गुन्ह्याची उकल होईल."

- मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, युनिट एक

Police
Crime News : मेहंदीचा रंग उतरण्याआधी तिन्ही ‘वधू’ गजाआड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com