Nashik ZP Super 50: ‘सुपर फिफ्टी’च्‍या 110 जागांसाठी 5 हजार 761 जणांनी दिली परीक्षा; उपस्‍थितीचे प्रमाण 75 टक्‍के

ZP Super 50 : जिल्‍हा परिषदेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्‍प असलेल्‍या ‘सुपर फिफ्टी’अंतर्गत रविवारी (ता. २१) जिल्‍हाभरातील २३ केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेण्यात आली.
Students present at the examination center at Vainteya Vidyalaya on Sunday.
Students present at the examination center at Vainteya Vidyalaya on Sunday.esakal
Updated on

Nashik ZP Super 50 : जिल्‍हा परिषदेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्‍प असलेल्‍या ‘सुपर फिफ्टी’अंतर्गत रविवारी (ता. २१) जिल्‍हाभरातील २३ केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेण्यात आली. उपक्रमात ११० विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार असून, त्‍यासाठी पाच हजार ७६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना प्रवेशासाठी दावेदारी केली. उपस्‍थितीचे प्रमाण ७५ टक्‍के राहिले असून, एक हजार ९९० विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांना जेईई व नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी ‘सुपर फिफ्टी’अंतर्गत मार्गदर्शन केले जाते आहे. (5 thousand 761 appeared for 110 seat of Super Fifty )

यंदा जेईईच्‍या निकालात या उपक्रमातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले होते. अल्‍पावधीतच या उपक्रमाला मोठे यश आले असल्‍याने आता उपक्रमात सहभागासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला दिसतो आहे. वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्‍नांवर आधारित या परीक्षेला जिल्‍हाभरातून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमातून जेईई आणि नीट यांसाठी प्रत्‍येकी ५५, असे एकूण ११० विद्यार्थ्यांची निवड होणार असून, एका जागेवर प्रवेशासाठी पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी दावेदारी केली आहे.

त्‍यामुळे निवडीच्‍या वेळी चुरस बघायला मिळेल. जिल्‍हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली परीक्षा पार पडली. परीक्षेचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाने केले. तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी व परीक्षा केंद्र असलेल्या शाळा मुख्याध्यापकांचे सहकार्य लाभले. (latest marathi news)

Students present at the examination center at Vainteya Vidyalaya on Sunday.
Nashik ZP Super 50 : ‘सुपर 50’साठी उद्या मुकाबला! जिल्ह्यातील 23 केंद्रांवर होणार लेखी परीक्षा

‘त्‍यांना’ दिला ऐनवेळी प्रवेश

परीक्षा देण्यासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना ऐन वेळी प्रवेश देताना, संधी उपलब्‍ध करून देण्यात आली. विविध केंद्रांवर एकूण २०९ विद्यार्थ्यांना कागदपत्रे तपासल्‍यानंतर परीक्षेला प्रविष्ट होण्याची परवानगी दिली.

तीन दिवसांत निकाल

परीक्षेसाठी ओएमआर उत्तरपत्रिकांचा वापर केला आहे. त्‍यामुळे परीक्षेच्या उत्तरपत्रिका येत्‍या तीन दिवसांत यांत्रिक पद्धतीने तपासल्‍यानंतर निकाल जिल्हा परिषद संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांना निकालासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

- परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी - सात हजार ५४२

- परीक्षेला उपस्‍थित विद्यार्थी - पाच हजार ७६१

- परीक्षेला गैरहजर विद्यार्थी - एक हजार ९९०

Students present at the examination center at Vainteya Vidyalaya on Sunday.
Nashik ZP Super 50 : ‘सुपर ५०’ उपक्रमातील 4 जागा दिव्यांगांना : ‘सीईओ’ आशिमा मित्तल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com