Suresh Sawant
sakal
नाशिक: तथाकथित साहित्यिक किती नवोदितांचे वा इतर साहित्यिकांचे साहित्य वाचतात, मुळात साहित्य क्षेत्र आत्मकेंद्री झाले असून, समस्येच्या गर्तेत अडकले आहे. त्यासाठी इतरांचे लेखन वाचणे गरजेचे आहे. आजच्या लेखनात केशवसुत, कुसुमाग्रज दिसत नाहीत व साहित्य क्षेत्राला एक प्रकारचे साचलेपण आल्याचे परखड मत राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारप्राप्त व साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक सुरेश सावंत यांनी व्यक्त केले.