
सिन्नर : शहर व तालुक्यात मकरसंक्रांतीला एकाच दिवशी सहा नागरिक जखमी झाले. यात दोघांच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्या. नायलॉन मांजामुळे दुचाकी चालकांसह नागरिकांचा वावर भीतीच्या सावटाखाली राहिला. दरम्यान, गस्त घालताना पोलिस पथकाने नायलॉन मांजा वापरणाऱ्या आठ पतंगबाजांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला. मच्छिंद्र अशोक जाधव दुचाकीवरून माळेगाव येथे कारखान्यात जात असताना लोणारवाडीजवळ त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला.