

नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यापूर्वी अर्ज सादर केलेल्या महिलांच्या अर्जांच्या फेरपडताळणीचे कुठल्याही स्वरूपाचे आदेश महिला व बालकल्याण विभागाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे यापूर्वी लाभ घेतलेल्या १५ लाख ७० हजार महिलांना नोव्हेंबर व डिसेंबरचे प्रत्येकी तीन हजार रुपये मिळतील. पण नक्की पैसे खात्यावर केव्हा जमा होणार याची महिलांना प्रतीक्षा लागून आहे. माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.