Scholarship News : जिल्ह्यातील 8 विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

Nashik News : पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्याच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील ८ विद्यार्थी झळकले आहेत.
Scholarship
Scholarshipesakal

Nashik News : पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्याच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील ८ विद्यार्थी झळकले आहेत. त्यात पाचवीच्या राज्य बोर्डाच्या ग्रामीण विभागाचे ३ तर आठवीच्या सीबीएसई -आयसीएसई विभागाच्या आठवीतील ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (Nashik 8 students in district scholarship merit list)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने झालेल्या पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीसाठीची परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत राज्य बोर्डाच्या ग्रामीण विभागातून अर्णव सुदर्शन सुरसे.

साकोरा माध्यमिक विद्यालय (९४.५५ टक्के, राज्यात ७ वा), संस्कार गणेश साळी क. बी. पाटील साकोरा माध्यमिक विद्यालय (९३.१९ टक्के, राज्यात १० वा) आणि विश्वजीत श्रीकांत देवरे, जि. प. विद्यालय, सोग्रस (९१.२७ टक्के, राज्यात १४ वा) हे झळकले आहे.

मात्र, राज्य बोर्डाच्या शहरी विभागातून पाचवीचा एकही विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकला नाही. पाचवीच्या सीबीएसई -आयसीएसई बोर्डात ध्रुव मच्छींद्र बोरसे, जेम्स इंग्लिश मीडियम स्कूल (९२.५१ टक्के, राज्यात तिसरी) आणि भार्गवी नंदकुमार जाधव. (latest marathi news)

Scholarship
Nashik Teacher Recruitment : शिक्षकांच्या कागदपत्रांची आज पडताळणी

होरायझन ॲकॅडमी ( ८८.४३ टक्के, आठवी) हे दोघांनी बाजी मारली आहे. सीबीएसई-आयसीएसई बोर्डाच्या आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अरीत प्रशांत चोपडा, विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल (८४.५६ टक्के, राज्यात १०वा) याने बाजी मारली. आठवीच्या राज्य बोर्डाच्या ग्रामीण विभागात सर्वेश संदीप भावसार.

न्यू इंग्लिश स्कूल, वडांगळी ( ८४.५६ टक्के, राज्यात २६ वा ) तर आठवीच्याच राज्य बोर्डाच्या शहरी विभागातून अनुष्का प्रशांत सोनवणे, र. ज. चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल, नाशिक रोड ( ९१. ९४ टक्के, राज्यात ९ वी) यांनी बाजी मारली आहे.

Scholarship
Nashik Police Recruitment : पुरुषांचा 41 तर, महिलांचा 39 ‘कटऑफ’! प्रवर्गनिहाय कटऑफ जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com