Nashik NMC : बाह्यस्त्रोताद्वारे महापालिका भरणार 90 वाहनचालक

Nashik NMC : महापालिकेतर्फे दोन वर्षासाठी ९० वाहनचालक बाह्यस्त्रोताद्वारे (आऊटसोर्सिंग) वाहन चालकांचे भरले जाणार आहे.
NMC Nashik
NMC Nashik esakal

Nashik NMC : महापालिकेतर्फे दोन वर्षासाठी ९० वाहनचालक बाह्यस्त्रोताद्वारे (आऊटसोर्सिंग) वाहन चालकांचे भरले जाणार आहे. यासाठी ६ कोटी ३४ लाख रुपयांचा प्रस्ताव यांत्रिकी विभागाने महासभेकडे सादर केला आहे. महापालिकेत वाहनांची संख्या जवळपास दीडशे आहे. (90 drivers will be hired by municipality through external sources )

परंतु वाहनांवर चालक नाहीत. आकृतीबंधानुसार महापालिकेने यापूर्वी भरलेले चालक सेवानिवृत्त झाले आहे. रिक्त पदांची जागा भरण्यास शासनाकडून परवानगी मिळत नाही. त्यामुळे महापालिकेने आऊटसोर्सिंगचा मार्ग अवलंबला आहे.

वाहन चालकांची भरती आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून केली जाणार आहे. २०१५ मध्ये वाहनचालक पदाचे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. (latest marathi news)

NMC Nashik
Nashik Agriculture News : क्रॉपकव्हरद्वारे वाढलेल्या रेडग्लोब द्राक्षबागेला प्रधान सचिवांनी भेट

आत्तापर्यंततीच प्रक्रिया सुरू आहे. सद्य:स्थितीमध्ये ७५ वाहन चालक कार्यरत असून ३१ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांची मुदत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे वाहनचालक पदासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.

यात ७५ ऐवजी ९० जडवाहन परवानाधारक वाहनचालकांची आवश्यकता यांत्रिकी विभागाने व्यक्त केली. त्या अनुषंगाने महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

NMC Nashik
Nashik ZP News : जिल्हा परिषदेचा 46 टक्के निधी खर्च! निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com