Nashik: विद्यार्थ्यांची नियमित उपस्‍थिती आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांची नियमित उपस्‍थिती आवश्‍यक

नाशिक : विद्यार्थ्यांची नियमित उपस्‍थिती आवश्‍यक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आयुर्वेद व होमिओपॅथी पदव्‍युत्तर शिक्षणक्रमातील विद्यार्थ्यांची नियमित उपस्‍थिती आवश्‍यक आहे. या संदर्भात महाविद्यालयाच्‍या अख्यत्‍यारीतील विषय असल्‍याने महाविद्यालय व प्राचार्यांनी आवश्‍यक खबरदारी घ्यावी. अनियमितता आढळल्‍यास विद्यार्थी व महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाणार असल्‍याचे महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्‍हाण यांनी स्‍पष्ट केले आहे.

कुलसचिव डॉ. चव्‍हाण यांनी बुधवारी (ता. १०) जारी केलेल्‍या परिपत्रकात म्‍हटले आहे, की आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांची उपस्‍थिती नोंदविणे ही बाब संबंधित महाविद्यालयांच्‍या अखत्‍यारीत येते. याबाबत दक्षता घेणे महाविद्यालयाची जबाबदारी आहे. सर्व पदव्‍युत्तर महाविद्यालयांच्‍या प्राचार्यांनी विद्यार्थी दैनंदिन उपस्‍थित राहत असल्‍याबाबत दक्षता घ्यावी. महाविद्यालयासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्‍यास किंवा तपासणींतर्गत विद्यार्थ्यांच्‍या उपस्‍थितीबाबत अनियमितता आढळल्‍यास विद्यार्थी व महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्‍पष्ट केले आहे.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

मेडिकल स्‍टुडंट असोसिएशनच्‍या तक्रारीनंतर सूचना

या संदर्भात मेडिकल स्‍टुडंट वेल्फेअर असोसिएशनने शासन व विद्यापीठाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार राज्‍यातील आयुर्वेद व होमिओपॅथी पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थी बेकायदेशीरपणे बहिःस्‍थ पदव्‍युत्तर पदवीचा अभ्यासक्रम करीत असल्‍याचा दावा केला आहे. महाविद्यालय नियमितपणे सुरू असताना, राज्‍यातील जम्‍बो कोविड सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे नोकरी केली जात असल्‍याचाही दावा आहे. या तक्रारीची दखल घेत कुलसचिवांनी परिपत्रक जारी करताना विद्यार्थी उपस्थितीबाबत खबरदारी घेण्याच्‍या सूचना केल्‍या आहेत.

loading image
go to top