Nashik Accident News : घरकुल योजनेचा स्लॅब कोसळून भाऊ-बहिण जखमी

Nashik News : पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर उभारलेल्या आवास योजना घरकुलांचा छताचा स्लॅब कोसळून घरात झोपलेले दोघे सख्खे भाऊ बहीण जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. १) मध्यरात्री घडली.
Former corporator Hemant Shetty while learning the problems of the residents of Gharkul Yojana in Gaudwadi at the incident site The collapsed slab in the second photo
Former corporator Hemant Shetty while learning the problems of the residents of Gharkul Yojana in Gaudwadi at the incident site The collapsed slab in the second photoesakal

Nashik News : पेठ रोड फुलेनगर गौंडवाडीत पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर उभारलेल्या आवास योजना घरकुलांचा छताचा स्लॅब कोसळून घरात झोपलेले दोघे सख्खे भाऊ बहीण जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. १) मध्यरात्री घडली. घटनेनंतर केवळ पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. (Brothers and sisters injured when slab of Gharkul Yojana collapsed)

मात्र, चोवीस तास उलटून गेल्यानंतरही संबंधित प्रशासनाने अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली नाही आहे, असा आरोप घरकुल आवास योजनेतील नागरिकांनी केला आहे. १९९२ ते १९९७ या पंचवार्षिकमध्ये महापालिकेने फुलेनगरमधील गोंडवाडी येथे जुनी घरे काढून नागरिकांना राहण्यासाठी दुमजली इमारत बांधली.

मात्र, वेळोवेळी डागडुजी न झाल्याने ही इमारत जीर्ण झालेली आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार मनपाकडे मागणी करूनही इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या घरकुलात वास्तव्यास असलेले संध्या कालिया शेडमाके (२६) व मन्नू शेडमाके (२७) असे छताचा स्लॅब कोसळून जखमी झाले.

त्यांना डोक्याला खांद्याला मार लागल्याने उपचारासाठी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दोन वर्षांपूर्वीदेखील याच गौंडवाडीत घरकुल योजनेच्या पहिल्या मजल्यावरचा गॅलरीचा कोसळून पाच वर्षाचा बालक जखमी झाल्याची घटना घडली होती. (latest marathi news)

Former corporator Hemant Shetty while learning the problems of the residents of Gharkul Yojana in Gaudwadi at the incident site The collapsed slab in the second photo
Bhushi Dam Accident Lonavala : पीडित कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

पर्यायी जागेची मागणी

दोन वर्षापूर्वी फुलेनगर गौंडवाडीत घरकुल योजनेच्या पहिल्या मजल्यावरचा गॅलरीचा कोसळून पाच वर्षाचा बालक जखमी झाल्याची घटना घडली होती. याच घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मनपा प्रशासनाने या ठिकाणी नवीन घरकुल योजना करावी, अशी मागणीदेखील माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, माजी नगरसेविका सरिता सोनवणे.

सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र, याकडे प्रशासनाने काणाडोळा केला. यामुळे छत कोसळल्याची घटना घडली. पर्यायी जागेवर राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी देखील केली आहे.

पुन्हा एकदा निवेदन

या ठिकाणी माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, शंकर हिरे, बाबा शेख आदींनी तत्काळ पाहणी केली. या वेळी घरकुलातील रहिवाशांनी समस्यांचा पाढा वाचला. त्याअनुषंगाने इमारत धोकादायक असल्याने इमारतीतील नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापर्यंत पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी व पुन्हा नव्याने परिसरात घरकुल योजना राबवावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केले असल्याचे माहिती हेमंत शेट्टी, शंकर हिरे यांनी सांगितले.

Former corporator Hemant Shetty while learning the problems of the residents of Gharkul Yojana in Gaudwadi at the incident site The collapsed slab in the second photo
Accident News : कॅनडामधील मायलेकांसह पंजाबमधील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com