Nashik Accident : कंडक्टर प्रवाशांना उठवायला मागे वळला अन्...; कंपनीचं स्पष्टीकरण

या बसमध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले होते, असाही आरोप केला जात आहे.
Nashik Bus Accident
Nashik Bus AccidentSakal

नाशिकजवळ एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मुंबईच्या दिशेने चाललेल्या बसची एका कंटेनरला धडक बसली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. हा अपघात कसा झाला, नक्की काय झालं, याबद्दल प्रवासी, प्रत्यक्षदर्शींनी आपले अनुभव सांगितले आहेत. त्यानंतर आता बसच्या संचालकांनी या अपघाताबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

Nashik Bus Accident
Nashik Accident : बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले होते?

आपल्याला कंडक्टरने फोन करून अपघाताची माहिती दिल्याचं चिंतामणी ट्रॅव्हल्सचे संचालक गुड्डू जयस्वाल यांनी सांगितलं. सकाळी कंडक्टरचा फोन आला, मोठा अपघात झालाय. एवढंच तो मला म्हणाला. त्यालाही नेमकं काय झालं कळलं नाही. अपघातावेळी कंडक्टर बसच्या मागच्या बाजूला गेला होता. एका पॅसेंजरला उठवायला कंडक्टर गेला होता. तितक्यात हा अपघात घडला. त्यामुळे नक्की काय झालं, हे त्यालाही नीट माहिती नाही.

Nashik Bus Accident
Nashik Accident: यंत्रणा ठरल्या फोल; दीड तास कोणी फिरकलंच नाही!

शॉर्ट सर्किट झाल्याने बसने पेट घेतला असू शकतो, असं ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांनी सांगितलं आहे. प्रवासाआधी बसचा फिटनेस, मेन्टेनन्स नियमितपणे केला जातो. प्रत्येक फेरीपूर्वी ही तपासणी केली जाते, असंही संचालक म्हणाले. या बसमध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले होते, असाही आरोप केला जात आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com