Nashik Accident News : भरधाव पीकअपच्या धडकेने कजवाडेच्या चुलतभावांचा मृत्यू!

Nashik News : मालेगाव - नामपूर रस्त्यावरील सावतावाडीनजिक नागाईमाता मंदिर परिसरात भरधाव पीकअपने दुचाकीला दिलेल्या जबरदस्त धडकेत कजवाडे येथील दोघे चुलतभाऊ जागीच ठार झाले.
Rohit Kapadnis, 
Rishikesh Kapadnis
Rohit Kapadnis, Rishikesh Kapadnisesakal

Nashik News : मालेगाव - नामपूर रस्त्यावरील सावतावाडीनजिक नागाईमाता मंदिर परिसरात भरधाव पीकअपने (एमएच १२, क्यूजी २५८७) दुचाकीला (एमएच ४१ बीजे २५०८ ) दिलेल्या जबरदस्त धडकेत कजवाडे (मालेगाव) येथील दोघे चुलतभाऊ जागीच ठार झाले. दुपारी साडे चारच्या सुमारास हा अपघात झाला. दोघा तरुणांच्या निधनाने कजवाडेसह काटवन भागात शोककळा पसरली आहे. (Kajwade cousin ​​died after being hit by speeding pickup)

कजवाडे येथील रोहित संभाजी कापडणीस (२०) व ऋषिकेश साहेबराव कापडणीस (१७) हे चुलत भावंडे मालेगावहून कजवाडेकडे जात होते. सावतावाडी शिवारात समोरून भरधाव आलेल्या पिक अपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दोघांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर पिकअप चालक वाहनासह फरार झाला. अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. फरार झालेल्या पिकअप चालकाला अजंग येथील ग्रामस्थांनी पकडले. चालक वाहन सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता. अजंग येथील ग्रामस्थांनी पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. (latest marathi news)

Rohit Kapadnis, 
Rishikesh Kapadnis
Pune Porsche Accident : अग्रवाल पिता-पुत्राच्या अडचणी आणखी वाढल्या! बांधकाम व्यावसायिकाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

अपघाताचे वृत्त समजताच वडनेर खाकुर्डी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रोहित हा मालेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य संभाजी कापडणीस याचा लहान मुलगा आहे. तर ऋषिकेश हा त्यांचा पुतण्या आहे. दोघे तरुण शैक्षणिक कामासाठी मालेगावला गेले होते.

घराकडे परत जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. दरम्यान पीकअपचा वेग जोरात होता तसेच गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. रात्री उशिरापर्यंत वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Rohit Kapadnis, 
Rishikesh Kapadnis
Beed Accident News : सोलापूर-धुळे हायवेवर धावता ट्रॅक पेटला! २५ टन सोयाबीन जळाल्याने २७ लाखांचे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com