rickshaw falls in river
sakal
जुने नाशिक: टाळकुटेश्वर गोदापात्रात रिक्षा आणि चालकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली होती. अग्निशामक पथकासह स्थानिक जीवरक्षकांनी दोरखंडाच्या सहाय्याने रिक्षा काढून त्याखाली दबलेला मृतदेह बाहेर काढला. मंगळवारी (ता. ३०) रात्री ही घटना घडली. हमीद अजीज शेख (वय ४६, रा. बुधवार पेठ) असे मृत चालकाचे नाव आहे.