Maha Shivratri 2024 : ज्योतिष गणनेनुसार तब्बल 300 वर्षांनी महाशिवरात्रीला शुभ योग; काही विशेष राशींना मोठा धनलाभ

Maha Shivratri 2024 : ज्योतिष गणनेनुसार तब्बल ३०० वर्षांनी महाशिवरात्रीला शुभ योग जुळून आल्याने यंदाची महाशिवरात्री काही राशींसाठी अतिशय विशेष ठरणार आहे.
Astrologi
Astrologiesakal

Maha Shivratri 2024 : ज्योतिष गणनेनुसार तब्बल ३०० वर्षांनी महाशिवरात्रीला शुभ योग जुळून आल्याने यंदाची महाशिवरात्री काही राशींसाठी अतिशय विशेष ठरणार आहे. या महाशिवरात्रीनंतर अगदी सहा दिवसांनी काही विशेष राशींना मोठा धनलाभ होणार आहे, तर काही राशी महादेवाच्या कृपेने अगदी श्रीमंत होऊ शकतात. महाशिवरात्र भगवान शंकराच्या विशेष पूजाविधीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. (nashik Astrological calculations auspicious yoga on Mahashivratri marathi news)

या दिवशी भाविक उपवास करून अभिषेकासह पूजा करतात. यंदा ८ मार्च २०२४ ला महाशिवरात्री साजरी होईल. वेदिक ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे, असा अद्‌भत योग तब्बल ३०० वर्षांनी निर्माण होत आहे असे संशोधनातून समोर आले आहे, अशी माहिती ज्योतिष वाचस्पती डॉ. नरेंद्र धारणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितली.

पहाटे ४:४५ पासून संपूर्ण दिवस शिवयोग

सकाळी ६:४५ सर्वार्थसिद्धी योग सुरू होणार

शुभ योग सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत असेल.

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहाच्या बाबतीतही शुभ योग जुळून येत आहे. मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राची युती ज्यामुळे चंद्र मंगळ योग निर्माण होत आहे. दुसरीकडे कुंभ राशीमध्ये शुक्र व शनी आणि सूर्याच्या युती त्रिग्रह योग घडून येत आहे. मीन राशीमध्ये राहू आणि बुधाची युती होत आहे. त्यामुळे या शुभ योगामुळे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वापासून काही राशींचे ‘अच्छे दिन’ सुरू होणार आहेत. (latest marathi news)

Astrologi
Nashik Maha Sanskruti Mahotsav : ‘गजर हरिनामाचा’ तून उलगडली वारी; पारंपरिक खेळांचे सादरीकरण

कोणत्या राशींवर शंकराची कृपा बरसणार आहे, हे बघू या. मात्र याचबरोबर वेदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशी बदल करतात. ८ मार्चला सकाळी ९:२१ मिनिटांनी ग्रहांचा राजकुमार बुधदेव मीन राशीत प्रवेश करणार आहे, तर १४ मार्चला ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत गोचर करणार आहे. यामुळे बुद्धिवादी आणि सूर्यदेवाची युती मीन राशीत होणार आहे.

त्यामुळे बुधादित्य योग निर्माण होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बुध आदित्य योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. या शुभ योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना अपार यश, सुख, समृद्धी लाभणार आहे. महाशिवरात्री हा दिवस सर्व भारतासाठी खूप खास आहे.

आता तुमच्या राशीचा जर यामध्ये समावेश नसेल तर अशावेळी या दिवशी जो व्यक्ती शिवलिंगावर पूर्ण भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असं सांगितलं जातं म्हणून ज्योतिष शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी राशीनुसार शिवलिंगावर अभिषेक करून महादेवाचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सल्ला दिला जातोय. कोणत्या राशीने अभिषेक कसा करावा ते पुढीलप्रमाणे-

Astrologi
Maha Shivratri : महाशिवरात्रीसाठी जय्यत तयारी सुरू; श्री कपालेश्‍वरासह सोमेश्‍वर महादेव देवस्थान सज्ज

१. मेष - राशीच्या लोकांनी गंगा जलाने शिवलिंगावर अभिषेक करावा आणि ‘ओम नमः शिवाय’ या भगवान शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा.

२. वृषभ - राशीच्या लोकांनी दूध आणि दह्याने शिवलिंगावर अभिषेक करावा. यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते.

३. मिथुन - राशीच्या व्यक्तींनी उसाच्या रसाचा अभिषेक शिवलिंगावर करावा आणि भगवान शंकराला धोत्रा सफळ अर्पण करावा.

४. कर्क - राशीच्या व्यक्तींनी दुधात साखर मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. यामुळे सौभाग्य प्राप्त होण्यास मदत मिळेल.

५. सिंह - राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर महाशिवरात्रीच्या दिवशी लाल चंदनाचा अभिषेक करावा. यामुळे सुख, समृद्धी मिळण्यास मदत मिळेल.

६. कन्या - राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी दूर्वा पाण्यात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. यामुळे मानसिक शांती मिळेल.

Astrologi
Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीचे ‘शिवत्व’

७. तूळ - राशीच्या व्यक्तीने महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पाण्यात साखर आणि तूप मिसळून अभिषेक करावा. यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळेल.

८. वृश्चिक - राशीच्या व्यक्तींनी पाण्यात साखर मिसळून मधाचा अभिषेक करावा. यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात.

९. धनू - राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. यामुळे सौभाग्य प्राप्त होण्यास मदत मिळेल.

१०. मकर - राशीच्या व्यक्तींनी तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा आणि यासोबतच बेल पानावर चंदन लावून चोळ लिंगावर अर्पण करावा. यामुळे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळेल.

११. कुंभ - राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करण्यास सांगितले जाते. यामुळे घरात सुख, समृद्धी राहील.

१२. मीन - राशीच्या लोकांनी पाण्यात केसर मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. यामुळे त्यांना उत्कृष्ट परिणाम आपल्या जीवनात दिसतील.

Astrologi
Maha Shivratri 2024: नांदूरमध्यमेश्वरला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा! रथासह मुखवट्याची मिरवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com