Maha Shivratri : महाशिवरात्रीसाठी जय्यत तयारी सुरू; श्री कपालेश्‍वरासह सोमेश्‍वर महादेव देवस्थान सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kapaleshwar temple latest marathi news

Maha Shivratri : महाशिवरात्रीसाठी जय्यत तयारी सुरू; श्री कपालेश्‍वरासह सोमेश्‍वर महादेव देवस्थान सज्ज

नाशिक : शनिवारी (ता. १८) महाशिवरात्र आहे. यासाठी लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शहरातील श्री कपालेश्‍वर महादेव मंदिरासह सोमेश्‍वर महादेव देवस्थानची जय्यत सुरू आहे. दोन्ही संस्थानच्या बैठकीत महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. (Preparations for Maha Shivratri festival begin Someshwar Mahadev Devasthanam ready with Sri Kapaleswara nashik news)

पंचवटीतील श्री कपालेश्‍वर देवस्थानतर्फे महाशिवरात्रीच्या तयारीसंदर्भात बुधवारी (ता. १५) संस्थानच्या कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत कोरनाानंतरच्या काळात प्रथमच मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या यात्रोत्सवाबाबत चर्चा झाली.

सध्या मंदिराच्या कलशाकडील काही भागाचा जिर्णोद्धार सुरू आहे. महाशिवरात्रीपर्यंत तो होण्याची शक्यता नसल्याने शनिवारी जीर्णोद्धाराचे काम बंद ठेवण्यात येणार असल्याचे विश्‍वस्त ॲड. भाऊसाहेब गंभिरे यांनी सांगितले.

दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. महाशिवरात्रीनिमित्त पारंपारिक मार्गावरून श्रींचा पालखी सोहळाही रंगणार आहे. संस्थानतर्फे सकाळी महापूजा होईल.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

त्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येईल. दरम्यान देणगीदारांनी संस्थानच्या कार्यालयात देणगी देऊन रीतसर पावती घ्यावी, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

मंदिरावर आकर्षक रोषणाई

शहरापासून पाच किलोमीटरवरील निसर्गाच्या सानिध्यातील सोमेश्‍वर महादेव देवस्थानातर्फेही महाशिवरात्रीनिमित्त नियोजन करण्यात आले आहे. यात दर्शनरांगासह वाहन पार्किंग, यात्रोत्सवानिमित्त लावण्यात येणारे खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आदींबाबत चर्चा झाली.

देवस्थानचे माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन विश्‍वस्त मंडळाची नियुक्ती झाली आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांच्या माळांनी मंदिर सजविण्यात येणार आहे.