Nashik Traffic Rule Break: बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक शाखेची कारवाई; इ-चलानद्वारे 60 हजारांचा ठोठावला दंड

Nashik News : शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील बेशिस्त वाहनचालकांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
traffic police action file photo
traffic police action file photoesakal

Nashik Traffic Rule Break : शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील बेशिस्त वाहनचालकांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. विना हेल्मेट, सीटबेल्टसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक शाखेकडून चारही विभागामध्ये धडक कारवाई सुरू केली. यात इ-चलानद्वारे १०५ केसेस करीत ६० हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. (Nashik Action taken by traffic department news)

वाहतूक शाखेकडून गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या कारवाईचे शिस्तबद्ध वाहनचालकांकडून स्वागत होते आहे. शहर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांनी वाहतूक शाखेच्या चारही विभागात बेशिस्तांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, रविवारी (ता.२८) सकाळपासून पंचवटी, सरकारवाडा, अंबड, नाशिकरोड या चारही विभागात ट्रीपलसीट, सिग्नल जंपींग, कर्कश हॉर्न यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०५ बेशिस्तांविरोधात कारवाई करण्यात येऊन, त्यांच्यावर ऑनलाईन इ-चलानद्वारे ६० हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बेशिस्तांचे धाबे दणाणले आहेत. (Latest Marathi News)

traffic police action file photo
Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

सिग्नल जंपींगच्या ८९ केसेस

शहर वाहतूक शाखेने रविवारी (ता. २८) दिवसभर आयुक्तालय हद्दीतील चार विभागात कारवाईची मोहीम राबविली. यात वाहतूक शाखेने ट्रीपलसीटच्या १५ केसेस करीत १५ हजार रुपये, सिंग्नल जंपींगच्या ८९ केसेस करीत ४४ हजार ५०० रुपये, कर्कश सायलेन्सरची १ केस करीत १ हजार रुपये असे १०५ केसेस करीत ६० हजार ५०० रुपयांचा दंड इ-चलानद्वारे  ठोठावला आहे.

traffic police action file photo
Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com