
पंचवटी : नाशिकची स्मार्टसिटीकडे वाटचाल सुरू आहे. पंचवटीत नागरी लोकवस्तीत वाढत आहे. या वाढत्या सिमेंटच्या जंगलात मोकळा श्वास घेता यावा यासाठी ठराविक अंतराच्या जागेवर उद्यानांचा विकास केला जातो. या उद्यानांचे मोठया दिमाखात उद्घाटन केले जाते. मात्र, काही दिवसात त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे विदारक चित्र दिसून येते. यानिमित्ताने बालगोपालांनी खेळायचे तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.