Nashik Agriculture News : मका, सोयाबीन, भात, कपाशीला यंदा प्राधान्य; खरिपासाठी एक लाख 62 हजार क्विंटल बियाणे

Nashik Agriculture : मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे.
Sowing
Sowingesakal

Nashik Agriculture News : मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे. जिल्ह्यात खरिपामध्ये सहा लाख २८ हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. त्यात सोयाबीन, मका व भाताच्या क्षेत्रात वाढ होणार असून, नागली, बाजरी, ज्वारी या तृणधान्यासह तूर, मूग, उडीद, भुईमूग, कारळे या कडधान्यांच्या पेरणीत घट होण्याची शक्यता आहे. ( corn soybean rice cotton are preferred this year in kharif)

खरिपाच्या पेरणीसाठी खासगी व शासकीय कंपन्यांकडील एक लाख ६२ हजार क्विंटल बियाण्यांची तर अडीच लाख टन रासायनिक खतांची आवश्‍यकता भासणार आहे. गेल्या वर्षी अवघा ७० टक्के पाऊस पडल्याने चार महिन्यांत भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. यंदा परतीचा पाऊस जूनपर्यंत सुरू होता तसेच मृगाची काही ठिकाणी हजेरी लागल्याने शेतीकामांना वेग आला आहे.

यंदाच्या खरीप हंगामात एकूण सहा लाख २८ हजार ७०० हेक्टरवर तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य व कापूस या नगदी पिकांची लागवड आणि पेरणी होणार आहे. भाताचे सर्वसाधारण क्षेत्र ८७ हजार ४८८ हेक्टर इतके आहे, त्यापैकी ९४ हजार हेक्टरवर भाताची आवणी होईल. जिल्ह्यात सोयाबीनचे ७६ हजार २३५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापेक्षा जास्त म्हणजेच एक लाख २२ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होईल.

मक्याच्या दोन लाख १७ हजार १०८ हेक्टर क्षेत्रापैकी काही हेक्टरवर मक्याची लागवड होईल. तूर, मूग, बाजरी, नागली, उडीद, भुईमुगाचे क्षेत्र घटणार आहे. जिल्ह्यात मालेगाव, नांदगाव, चांदवड, सिन्नर, देवळा या भागात कपाशीचे पीक घेतले जाते. कपाशीच्या ४६ हजार हेक्टरपैकी ४० हजार हेक्टरवर लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. ८० हजार हेक्टरवर लाल कांद्याची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. (latest marathi news)

Sowing
Nashik Agricultural News : सोयाबीन उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा! काढणी होऊन उलटले 4 महिने तरी भाव जैसे थे

सव्वादोन लाख टन खताची गरज

खरिपासाठी दोन लाख २० हजार टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. यात यूरिया ७६ हजार ९०० टन, डीएपी १८ हजार ३०० टन, तर ‘एसएसपी’च्या २६ हजार ५०० टनांचा यात समावेश आहे. ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाने केली आहे. गेल्या वर्षी सहा लाख २६ हजार १९० हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती.

यंदा यात वाढ झाली असून, सहा लाख २८ हजार ७०० हेक्टर क्षेत्र खरिपासाठी निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरा यंदा मक्याचा असेल. दोन लाख ४२ हजार हेक्टरवर मका, तर ९४ हजार हेक्टरवर भात, तर केवळ ६०० हेक्टरवर ज्वारीची लागवड केली जाईल. याशिवाय बाजरी ६१ हजार, नागली १६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे.

१७ भरारी पथकांची नियुक्ती

बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून महाराष्ट्रात गुजरात व मध्य प्रदेशातून बोगस बियाणे दाखल होण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने कृषी विभागाने १७ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. एका शेतकऱ्याला खतांच्या जास्तीत जात पाच बॅगा दिल्या जातील. त्यामुळे खतांची साठवणूक करण्यावर मर्यादा घातली जाणार आहे. साडेआठ हजार टन यूरियाची साठवणूक केल्यामुळे टंचाई निर्माण होताच हा यूरिया बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

Sowing
Nashik Agriculture: बळीराजाला कांद्यापाठोपाठ द्राक्षही रडविणार! निर्यातीच्या खर्चात वाढ झाल्याने द्राक्ष उत्पादकांची वाढली चिंता

बियाण्यांची आवश्‍यकता (आकडे क्विंटल)

पीक................क्षेत्र हेक्टर.........बियाणे

ज्वारी................६००.................४८

संकरित बाजरी.----५१८५०...........१५५६

सुधारित बाजरी ---९१५०...........३६६

भात....................९४ हजार.......१८०४८

नागली...............१६ हजार.......२४

तूर.......................५ हजार.........२६३

मूग.......................१८ हजार..........५९४

उडीद....................५८००..............३०५

भुईमूग..................२३ हजार.........९२०

खुरासणी..............१८००..............९

कापूस..................३९५००............७११

सोयाबीन.....एक लाख २२ हजार...९१५००

एकूण...............५ लाख ६ हजार.....एक लाख ६२ हजार २४३

Sowing
Nashik Agriculture News : शेणखताला सोन्याचा भाव! 8 टनासाठी मोजावे लागतात 26 हजार रूपये

रासायनिक खतांची परिस्थिती (आकडे टन)

१०:२६:२६ ते १९:१९:१९ या संयुक्त खतांना एकत्रितपणे ९६ हजार ४०० टन एवढी मंजुरी देण्यात आली आहे.

खताचा प्रकार..........मागणी.........मंजूर आवंटन

यूरिया....................एक लाख टन......७६९००

एमओपी...............पाच हजार.............२५००

डीएपी...................२६ हजार...............१८ हजार ३००

एसएसपी..............३१ हजार.................२६ हजार ५००

१०:२६:२६............३५ हजार...............००

१२:३२:१६.............७ हजार..................००

१५:१५:१५.............१८ हजार................००

१६:१६:१६.............७ हजार..................००

२०:२०:००.............१६ हजार..............००

२४:२४:००..............११ हजार.............००

१९:१९:१९..............दोन हजार............००

एकूण............ दोन लाख ६० हजार......दोन लाख २० हजार

Sowing
Nashik Agriculture News : पिवळ्या सोन्याची होणार विक्रमी लागवड; खरिपाची तयारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com