Nashik Agriculture News: मुरंबीला 22 वर्षांपासून सेंद्रियशेतीचा प्रयोग! मिळते भरघोस उत्पादन

According to Bhaskar while showing Indrayani paddy farming in organic method. Neighbor Kiran Musle
According to Bhaskar while showing Indrayani paddy farming in organic method. Neighbor Kiran Musleesakal

इगतपुरी : काही दिवसांपासून विविध भागांत कमी क्षेत्रात व कमी खर्चात जास्त उत्पादनाच्या अपेक्षेने शेतीत रासायनिक खते वापरली जात आहेत. मात्र, त्याचा मनुष्याच्या आरोग्यावर अनेक परिणाम पाहावयास मिळतात. गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.

मात्र, मुरंबी (ता. इगतपुरी) येथील भास्कर मते यांनी रासायनिक खतांना कायमचा फाटा देऊन २२ वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहेत. त्यांची सेंद्रिय शेती पाहून जिल्ह्यातील शेतकरी आता या शेतीकडे वळू लागले आहेत. (Nashik Agriculture News experimenting with organic farming for 22 years great product obtained farmer at muranbi)

सेंद्रिय शेतीत शेणखत, गोमूत्र आदी साहित्य वापरून नावीन्यपूर्ण प्रयोग केला जातो. माणूस ही परमेश्वराची उत्कृष्ट कलाकृती आहे. अशा व्यक्तीला विषमुक्त अन्न मिळाले, तर माणसाचे आरोग्य चांगले राहू शकते.

मनुष्याला विषापासून वाचवायचे असेल, तर सेंद्रिय शेती करणे महत्त्वाचे असल्याचे भास्कर मते यांनी सांगितले. राज्य सरकारच्या कृषी विभागाने ३५ शेतकऱ्यांचा गट २०१६ मध्ये स्थापन केला होता. वेळोवेळी शेतकी प्रदर्शनात सहभाग घेऊन ग्राहक मिळू लागला.

लाकडी तेल घाणा सुरू केला. ऊसापासून सेंद्रिय गुळ तयार करणे सुरू आहे. शेतात गावठी गाईचे शेणखत, हिरवळीचे खत, सर्व पेंडी, रबडी यांच्या वापरणे जमिनीचा पोत सुधारला व कडब्याचे प्रमाण वाढले.

According to Bhaskar while showing Indrayani paddy farming in organic method. Neighbor Kiran Musle
Dhule Agriculture News : केळी उत्पादकांना 17 कोटींचा पीकविमा मंजूर

कोणतेही तणनाशक वापरत नाहीत. त्यामुळे विहिरीचे पाणी नैसर्गिक आहे. सेंद्रिय शेतीतून वार्षिक उलाढाल नऊ लाखांपर्यंत होत असल्याचे श्री. मते यांनी सांगितले. आरोग्यदायी गुळासाठी दहा एकरमध्ये श्री. मते यांनी ऊसलागवड केली.

त्याबरोबरच दहा एकरात इंद्रायणी जातीच्या भातलागवड केली. पिकांना शेंगदाणा ढेप, हिरवळीची खते देतात. गोमूत्र, शेण, गूळ, डाळीचे पीठ, स्लरी टाकून रबडी बनविली जाते.

भुईमूगापासून तेल बनवतात, तर सूर्यफूल तेल, तीळ तेल, तांदूळ, डाळी तयार करतात. प्रदर्शनातून विक्री केली जाते. या माध्यमातून महिन्याला ४० ते ५० हजार उत्पन्न मिळते.

रब्बी हंगामध्ये मूग, हरभरा, मसूर घेतात. त्यांची सेंद्रिय शेतकरी मित्र ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी आहे. त्याचबरोबर भास्कर मते जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करतात.

According to Bhaskar while showing Indrayani paddy farming in organic method. Neighbor Kiran Musle
Success Story: नौदलास गवसणी घातलेल्या हर्षलच्या सत्काराला जमला अख्खा गाव! प्रतिकूल परिस्थितीत संघर्षातून गरुडझेप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com