Nashik Agriculture: केरसाणेत बटाटा लागवडीचा यशस्वी प्रयोग! उन्हाळी कांद्याचे महागडे रोप न मिळाल्याने शेतकऱ्यांचा बटाट्याकडे कल

Agriculture News : पारंपरिक पिकांना फाटा देत केरसाणे (ता. बागलाण) येथील बाळू मानसिंग अहिरे या प्रयोगशील शेतकऱ्याने नियोजन व परिश्रमातून बटाट्याची शेती फुलविली आहे.
Successful experiment of potato cultivation in the field by experimental farmer Balu Ahire.
Successful experiment of potato cultivation in the field by experimental farmer Balu Ahire.esakal

नरकोळ : पारंपरिक पिकांना फाटा देत केरसाणे (ता. बागलाण) येथील बाळू मानसिंग अहिरे या प्रयोगशील शेतकऱ्याने नियोजन व परिश्रमातून बटाट्याची शेती फुलविली आहे. नियोजनबद्ध शेती केल्यास कुठल्याही पिकातून चांगले उत्पादन घेता येते. असा आदर्श त्यांनी शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे. त्यांनी प्रथमच आपल्या शेतात बटाटा लागवड करून अभिनव प्रयोग त्यांनी यशस्वी केला. त्यांनी केलेला प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतात भेट देत आहे. (Nashik Agriculture Success Experiment Potato Cultivation kersane marathi news)

श्री. आहिरे यांना कांदा पिकांबरोबरच रताळी हे पीक मोठ्या मेहनतीने घेत. परंतु यंदा दिवाळी हंगामात बेमोसमी पावसाने ऐनवेळी कांदा रोपांचे नुकसान झाले. त्यामुळे महागडे रोप घेण्यापेक्षा बटाटा लागवड करण्याचा निर्णय घेत यशस्वी करूनही दाखविला. श्री. अहिरे यांनी त्यानी पंचवीस गुंठे क्षेत्रात साडेपाच क्विंटल २२ रुपये किलो दराने बटाट्याचे बेणे डांगसौदाणे येथील उत्पादकांकडून घेतले.

त्यानंतर सरी पद्धतीने त्यांची लागवड केली. श्री. आहिरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून गावातील युवा शेतकऱ्यांनी पुढील हंगामात बटाटा पीक घेण्याचा मानस ठेवला आहे. बटाटा मध्ये प्रथिने कर्बोदके, पिष्टमय पदार्थ आणि क जीवनसत्त्वे यामुळे आहारात देखील याचे महत्त्वाचे स्थान आहे बटाट्याची लागवड राज्यात मुख्यतः रब्बी हंगामात केली जाते. (Latest Marathi News)

Successful experiment of potato cultivation in the field by experimental farmer Balu Ahire.
Dhule Agriculture News : शिरपूर पॅटर्नमुळे शेती झाली बागायती

केरसाणे परिसरात ऊस, भुईमूग, मका, मिरची, टोमॅटो, कांदा, द्राक्ष, डाळिंब, कोबी आता बटाटा हे दहावे पीक ठरले आहे.

"बियाणे खरेदी, लागवड खर्च, खत व इतर खर्च यावर २० ते २५ हजार खर्च झाला. इतर पिकांच्या तुलनेत बटाटा हे पीक कमी खर्चाचे व कमी मेहनतीचे आहे. पुढील वर्षी आपण गावातील युवा शेतकऱ्याना बटाटा लागवड बाबत मार्गदर्शन करून क्षेत्रात वाढ करणार."

- बाळू आहिरे, प्रयोगशील शेतकरी, केरसाणे

Successful experiment of potato cultivation in the field by experimental farmer Balu Ahire.
Nashik Agricultural Success: दावचवाडी येथे अंध दांपत्याने फुलविली द्राक्षशेती! ‘तिमिरातून तेजाकडे’ धुमाळ दांपत्याचा संदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com