नाशिक: अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊस भाडेतत्त्वावर घेतलेल्या उत्तर प्रदेशातील दोघा संशयितांनी भाडे थकविले. त्यामुळे वेअर हाऊसच्या अधिकाऱ्यांनी गोदामात असलेल्या शहरातील २० व्यापाऱ्यांचा सुमारे तीन कोटी रुपयांचा माला जप्त करीत लिलावात काढला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात उत्तर प्रदेशातील दोघा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.