
Maharashtra Sanctions Nine Level-2 Centers for Comprehensive Treatment.
Sakal
नाशिक : द्वितीय स्तरावरील कर्करोग केंद्र म्हणून राज्यात नऊ केंद्रांना सरकारने मान्यता दिली आहे. त्यात नाशिक, अमरावती, पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नांदेड, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणांचा समावेश आहे. राज्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांना दर्जेदार, सुलभ आणि संपूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाच्या नव्या शासन निर्णयानुसार ही द्वितीय स्तरावरील (एल-२) कर्करोग उपचार केंद्रे उभारली जाणार आहेत.