esakal | Nashik | शहरात आणखी ५२६ सीसीटीव्ही कॅमेरे
sakal

बोलून बातमी शोधा

सीसीटीव्ही कॅमेरा

नाशिक : शहरात आणखी ५२६ सीसीटीव्ही कॅमेरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहरात ५२६ सीसीटीव्ही बसविण्यास पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक होणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ मेसेजिंग डिसप्ले (व्ही.एम.डी.), पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टिम (पी.अे. सिस्टिम), इमरजन्सी कॉल बाॅक्स (ईसीबी) बसविण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार शहरात २४२ ठिकाणी ५२६ सीसीटीव्ही कॅमेरे, चार व्हीएमडी, आठ पी.अे. सिस्टीम व नऊ इसीबी यंत्रणा बसविण्यास पोलिस आयुक्तांनी परवानगी दिली आहे.

हेही वाचा: "हाथरस घटनेवर अश्रू ढाळणाऱ्या प्रियांका पुण्यातील प्रकरणावर चुप?"

शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी यंत्रणांनी वेळोवेळी सर्व्हेक्षण करून सीसीटीव्ही बसविण्याच्या जागा प्रस्तावित केल्या होत्या. सीसीटीव्ही आणि स्मार्ट इलेमेंटबाबत शहरातील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्व्हेक्षण करून प्रशासनाने २४२ ठिकाणी ५२६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी सुमारे ८५० सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यानंतर ५२६ सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय झाला आहे. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे शहरास कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा मिळणार असून, गुन्हे उघडकीस आणण्यास मदत होईल. सीटीव्हीसह इतर यंंत्रणा बसविण्याच्या कामास लवकरच सुरवात होणार आहे.

loading image
go to top