
नाशिक : आदिवासी व्यक्ती ते बिगर आदिवासी प्रकरणामध्ये भरवज ग्रामपंचायतीत ठराव घेण्यासाठी महिला ग्रामसेविकेला ३० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुवर्णा छगन आहेर (३९) असे ग्रामसेविकेचे नाव आहे. तक्रारदार यांचा जमीन खरेदी-विक्री व्यवसाय आहे.