नाशिक : बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणातील खटल्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून नाशिकचे ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने ॲड. मिसर यांची निवड केली आहे. (Appointment of advocate Ajay Misar for Badlapur sexual assault case)
बदलापूर येथील लैगिंक अत्याचार आणि संशयित आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर यामुळे सदरचा विषय राज्यात गाजतो आहे. राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. संवेदनशिल असलेल्या याप्रकरणात न्यायालयात सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. मिसर हे नाशिक जिल्हा न्यायालयात विशेष सरकारी वकील आहेत.
आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर व यासंदर्भातील काही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच, शिंदेच्या एन्काऊंटरवरून पोलीसांवर टीकाही होते आहे. अॅड. मिसर यांची शासनाने यापूर्वीही अनेक संवेदनशिल खटल्यांमध्ये सरकार पक्षातर्फे नियुक्ती केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.