Nashik News : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थान विकास आराखड्यास मंजुरी; आमदार सरोज आहिरे यांच्या मागणीची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल

Nashik News : सुविधांचा अभाव असल्याने वारकऱ्यांची गैरसोय होते. राज्य शासनाने याकडे तत्काळ लक्ष घालून निधी मंजूर करून देण्याची मागणी आमदार सरोज आहिरे यांनी पावसाळी अधिवेशनात केली.
MLA Saroj Ahire giving letter to Finance Minister and Deputy Chief Minister Ajit Pawar
MLA Saroj Ahire giving letter to Finance Minister and Deputy Chief Minister Ajit Pawaresakal

Nashik News : राज्यातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने वारकऱ्यांची गैरसोय होते. राज्य शासनाने याकडे तत्काळ लक्ष घालून निधी मंजूर करून देण्याची मागणी आमदार सरोज आहिरे यांनी पावसाळी अधिवेशनात केली. (Approval of Nivruttinath Sansthan Development Plan)

आमदार आहिरे यांनी मागणी करताच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्काळ याची दखल घेत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांसाठी प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी दिली. आमदार आहिरे म्हणाल्या की, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या विकासाकरिता संस्थानकडून विविध मागण्या करण्यात आल्या आहे.

संस्थांसाठी ३० कोटीच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्याबरोबरच इतरही विषयास तत्काळ मंजुरी द्यावी. जगद्गुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी, संप्रदायातील सर्व संतांचे मोठे गुरुबंधू मानले जातात. त्यांची समाधी नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आहे. त्या ठिकाणी राज्यभरातील लाखो भाविकांची भक्ती भाविकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते.

मात्र या ठिकाणी मूलभूत सेवा सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. त्यामुळे संस्थानकडून प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत. प्रमुख मागणीपैकी जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री. निवृत्तीनाथ महाराज संस्थान प्रारूप विकास आराखड्यास तरतूद करून निधी उपलब्ध करून देणे, दगडी सभामंडपाचे कामास निधी द्यावा, पंढरपूर येथे शासकीय जागेतून संस्थानकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, यासह प्रमुख मागण्या आमदार सरोज अहिरे यांनी विधीमंडळात केली. (latest marathi news)

MLA Saroj Ahire giving letter to Finance Minister and Deputy Chief Minister Ajit Pawar
Nashik Police Recruitment Written Test : पोलीस भरतीची आज लेखी परीक्षा! शहराची KTHM तर ग्रामीणची भुजबळ नॉलेज सिटीत

नाथांच्याही पालखीला स्वतंत्र मार्ग असावा

राज्यातील प्रमुख पालखी मार्ग जसे जळगाव येथील संत मुक्ताई पालखी मार्ग या पालखी मार्गाच्या धर्तीवर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या पालखी राज्य मार्गाची निश्चिती करून पालखी मार्ग निर्माण करावा, जेणे करून सद्य:स्थितीत त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या वारीतील वारकऱ्यांना वारी पूर्ण करण्याकरिता एकूण कालावधी २८ दिवासांचा लागतो. सदरचा पालखी मार्ग निश्चित झाल्यास ८ दिवसाचा पालखीचा कालावधी कमी होईल.

"आमदार अहिरे यांनी आमच्या तीनही मागण्या विधीमंडळात मांडल्या. व विकास आराखडा तयार करण्यास मान्यता मिळाली. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंद असून देवस्थानच्यावतीने आम्ही त्यांचे आभार मानतो." - कांचन जगताप, अध्यक्ष, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज देवस्थान

MLA Saroj Ahire giving letter to Finance Minister and Deputy Chief Minister Ajit Pawar
Nashik Agriculture News : क्रॉपकव्हरद्वारे वाढलेल्या रेडग्लोब द्राक्षबागेला प्रधान सचिवांनी भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com