Nashik News : विद्यार्थी पटसंख्या अन्‌ मोफत पाठ्यपुस्तकांचा बसेना मेळ; जुनी पुस्तके जमा करण्याची वेळ

Nashik : वर्ष सुरू झाले की नवे कोरे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसतात. मात्र, हे वर्ष त्याला काही अंशी अपवाद ठरणार आहे.
books
books esakal

Nashik News : वर्ष सुरू झाले की नवे कोरे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसतात. मात्र, हे वर्ष त्याला काही अंशी अपवाद ठरणार आहे. मागील वर्षी शाळांना पुरविलेली पाठ्यपुस्तक संच आणि यु-डायस मधील विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने हे पुस्तके शाळांकडे शिल्लक असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. त्यामुळे जिल्ह्याला यंदा तब्बल २७ हजार पुस्तक संच मागणीच्या तुलनेत कमी मिळणार असल्याने. (nashik As district will get about 27 thousand sets of books less than demand this year marathi news)

नव्या वर्षात विद्यार्थ्यांना पुस्तके कमी पडू नये म्हणून शाळेवर विद्यार्थ्याकडूनच जुने पुस्तके जमा करण्याची वेळ आली आहे. सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी झाल्यानंतर २००९ पासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी माध्यमांच्या पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली जातात. योजनेत राज्यभरात सुमारे एक कोटी २० लाखाच्या आसपास पुस्तकांचे वाटप होते.

नाशिक जिल्ह्यातच जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या मिळून किमान ५ लाख ५० हजाराच्या आसपास पुस्तकांचे वाटप शिक्षण विभाग करते. तालुका पातळीवरील पंचायत समितीकडून नोंदवलेल्या मागणीनुसार शाळांना यु-डायस मधील विद्यार्थी संख्येच्या आधारे पाठ्यपुस्तक वितरण केले जाते.

मागील वर्षी समग्र शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचे संच शाळांना पुरविण्यात आले. मात्र २०२३-२४ मधील विद्यार्थी पटसंख्या त्यातुलनेत कमी आहे. विद्यार्थी कमी आणि पुस्तके जास्त असल्याने ही पुस्तके शाळांकडे शिल्लक असल्याचा संदर्भ देऊन सदरची पाठ्यपुस्तके येत्या शैक्षणिक वर्षासाठीच्या मागणीतून वजावट करून देण्यात येणार आहे. तसे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे. (latest marathi news)

books
Nashik News : शालेय पुस्तकांचा पुनर्वापर करूया...! ‘टेक्स बुक एक्स्चेंज ड्राईव्ह: रंगूबाई जुन्नरे शाळेचा स्तुत्य उपक्रम

संचाची होणार वजावट

आगामी वर्षासाठी ई-बालभारती पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करताना जिल्ह्यातून मराठी माध्यमाचे पहिलीचे १० हजार ९९४, इयत्ता दुसरीचे ५ हजार ९६८, इयत्ता तिसरीचे २ हजार ८८ तर इयत्ता आठवीचे २ हजार ७५४ असे २६ हजार २६८ पाठ्यपुस्तकांची वजावट होणार आहे. याशिवाय हिंदी माध्यमांचे सर्व वर्गांचे ६६४ व उर्दू माध्यमांचे ५८२ संच वजावट होऊन नव्याने पुस्तके मिळणार आहेत.

मागील वर्षीच अनेक शाळांना कमी पुस्तके मिळाल्याने जुने पुस्तके वापरावी लागली होती. मागील वर्षी जुनी पुस्तके शिल्लक नसताना देखील पुन्हा संचांमध्ये घट होणार असल्याने शिक्षकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

आत्तापासूनच जमवाजमव सुरू

विद्यार्थी संख्या आणि पाठ्यपुस्तक संच यांची तफावत हा दरवर्षीच भेडसावणारा प्रश्न आहे. यावर्षी तर अधिकृतपणे जिल्ह्यातील २७ हजार संच कमी होणार असल्याने प्रशासनापुढेही पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे अजून शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून आत्ताच जुने संच जमा करून ठेवण्याचा पर्याय शिक्षण विभाग देत असून अनेक शाळांनी देखील हा पर्याय अवलंबत विद्यार्थ्यांकडून पुस्तके जमा करण्याची मोहीम सुरू केली आहे.

''प्रत्येक विद्यार्थ्याला नवीन पाठ्यपुस्तक मिळायला पाहिजे. दरवर्षीच मोठ्या पटसंख्येच्या शाळांना कमी पुस्तक संच मिळतात. परिणामी अनेक शाळा जुन्या पुस्तकांवर गरज भागवतात. मागील वर्षीही अनेक शाळांना कमी पुस्तके मिळाली होती. असे असताना यावर्षी मोठ्या प्रमाणात संच वजावट होणार आहे. प्रशासनाने गोंधळ हो न देता विद्यार्थ्यांच्या संख्येएवढी पुस्तके उपलब्ध करायला हवी.''- बाजीराव सोनवणे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ,नाशिक

books
Nashik News : देवळ्यात महामार्गाच्या कामास पुन्हा ब्रेक! लगतच्या क्षेत्राची मोजणी करण्याचा प्रश्न ऐरणीवर

तालुकानिहाय वजा होणारी पुस्तक संच.

तालुका कमी मिळणारे संच

बागलाण १५८१

चांदवड १०३३

देवळा ७७४

दिंडोरी २९३३

इगतपुरी २०२३

कळवण १७३२

मालेगाव २६५७

नांदगाव १३१७

नाशिक ९२६

निफाड १९४४

पेठ ३७७

सिन्नर १५९१

सुरगाणा २८३६

त्रंबकेश्वर २००८

येवला २५३६

एकूण २६२६

books
Nashik News : राष्ट्रीय महामार्ग विभागाचे यात्रीनिवास धुळखात; बांधकामावर कोट्यवधी खर्च

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com