esakal | Nashik : मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

Mantralay

Nashik : मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या मागणीकरता बुधवारी मुंबईत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. वेळीच पोलिसांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी घोडके यास ताब्यात घेतले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र न्यायालयीय कचाट्यात हा विषय अडकून पडला आहे. आगामी महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होण्याची शक्यता आहे. म्हणून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे घोडके याने यावेळी सांगितले.

मंडल आयोगाने ओबीसी समाजासाठी २७ टक्के आरक्षण बहाल केले आहे. मात्र त्यावर भलत्याच लोकांनी डल्ला मारल्याने खरे ओबीसी अडचणीत सापडले आहेत. आता त्यांच्या राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. जे खरे ओबीसी आहेत, ते आता राजकीय पटलावर दिसणार नाहीत. याच नैराश्यातून आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे घोडके याने निवेदनात म्हटले आहे. घोडके नाशिक जिल्ह्यातील आहेत.

loading image
go to top