Dindori Lok Sabha Constituency : बाबू भगरेंना 20 हजारांत लाखमोलाची मते!

Nashik News : नामसाधर्म्य आणि तुतारी चिन्हाच्या बळावर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात तब्बल एक लाखावर मते मिळविणारे बाबू सदू भगरे यांनी संपूर्ण निवडणुकीत अवघा २० हजार रुपये खर्च केला आहे.
Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituencyesakal

Nashik News : नामसाधर्म्य आणि तुतारी चिन्हाच्या बळावर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात तब्बल एक लाखावर मते मिळविणारे बाबू सदू भगरे यांनी संपूर्ण निवडणुकीत अवघा २० हजार रुपये खर्च केला आहे. निवडणुकीचा अंतिम खर्च त्यांनी निवडणूक विभागाला सादर केल्यावर त्यांचा खर्च उघडकीस आला. (Dindori Lok Sabha Constituency)

तसेच, नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार राजाभाऊ वाजे यांना देणगी स्वरूपात मिळालेल्या रकमेपेक्षाही त्यांचा निवडणुकीचा खर्च कमी झाल्याचे त्यांनी सादर केलेल्या खर्चाच्या विवरणपत्रावरून स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना ९५ लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली आहे.

नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांनी अंतिम खर्च निवडणूक विभागाकडे गुरुवारी (ता. ४) सादर केला. नाशिक लोकसभेत सर्वाधिक खर्च महायुतीचे उमेदवार माजी खासदार हेमंत गोडसे यांनी ८६ लाख दोन हजार ११३ इतका केला आहे. त्यांच्यासाठी शिवसेना पक्षाने ४५ लाखांचा खर्च केला. राजाभाऊ वाजे यांना एकूण ८३ लाखांची देणगी मिळाली होती.

त्यापैकी ८० लाख ८८ हजार रुपये त्यांनी निवडणुकीत खर्च केला आहे. शांतिगिरी महाराजांनी २२ लाख दहा हजार रुपये खर्च केले. त्यापैकी १८ लाख ६३ हजारांची देणगी त्यांना विविध संस्था व व्यक्तींकडून प्राप्त झाली होती. सिद्धेश्‍वरानंद सरस्वती यांनी १९ लाख पाच हजार रुपये खर्च झाल्याचे निवडणूक आयोगाला कळविले. (latest marathi news)

Dindori Lok Sabha Constituency
Nashik Police Recruitment : पुरुषांचा 41 तर, महिलांचा 39 ‘कटऑफ’! प्रवर्गनिहाय कटऑफ जाहीर

त्यापैकी १६ लाख ९७ हजार रुपये त्यांना देणगी स्वरूपात मिळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नाशिक लोकसभेतील इतर उमेदवारांचा खर्च मर्यादित असून, त्यांना देणगी न मिळाल्याचे त्यांनी विवरणपत्रात म्हटले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ‘बाबू भगरे पॅटर्न’ चांगलाच चर्चेत राहिला. अपक्ष उमेदवारी करूनही केवळ नामसाधर्म्य व तुतारी या चिन्हाच्या बळावर त्यांनी एक लाख नऊ हजार मते मिळवली.

त्यामुळे महाविकास आघाडीची मते कमी झाली. परंतु, त्याचा निकालावर फारसा परिणाम झाला नाही. या मतदारसंघातील माजी मंत्री डॉ. भारती पवार यांनी ७५ लाख १४ हजार रुपये खर्च सादर केला आहे; तर खासदार भास्कर भगरे यांनी ६२ लाख ३२ हजार रुपये खर्च झाल्याचे निवडणूक आयोगाला कळविले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मालती ढोमसे यांनी अवघे पाच लाख रुपये खर्च केल्याचे दिसून येते. या तुलनेत इतर उमेदवारांनी मर्यादित खर्च केल्याचे दिसून येते.

मालती ढोमसेंच्या विरोधात गुन्हा

दिंडोरी मतदारसंघाच्या निवडणुकीत देणगी स्वीकारताना तसेच खर्च करताना रोखतेची मर्यादा न पाळल्याने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मालती ढोमसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तर दुसरीकडे नाशिक मतदारसंघातील उमेदवार भाग्यश्री अडसूळ यांनी खर्चच सादर न केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

Dindori Lok Sabha Constituency
Nashik Teacher Recruitment : शिक्षकांच्या कागदपत्रांची आज पडताळणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com