
इंदिरानगर : पाथर्डी फाटा भागातील प्रभाग क्रमांक ३१ मधील मुख्य रस्त्यांसह अनेक कॉलनी भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज धुळीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेतर्फे तक्रार क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या भागात फेरफटका मारून येथील रस्त्यांची परिस्थिती प्रत्यक्ष बघावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहेत.