नाशिक- चोरीछुप्या मार्गाने भारतात दाखल झालेल्या बांगलादेशी घुसखोरांच्या गुन्ह्यांचा तपास थंडावल्याचे दिसून येते आहे. सुरत, मुंबईमार्गे नाशिकमध्ये आलेल्या चार बांगलादेशी महिलांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आली असतानाही पोलिसांच्या हाती याप्रकरणी ठोस काही लागू शकलेले नाही. तर, काही महिन्यांपूर्वीही आडगाव हद्दीतून घुसखोर बांगलादेशींना अटक केली होती. त्या प्रकरणामध्ये तपासात घुसखोरांच्या भारतात दाखल होण्यामागील उलगडा होऊ शकलेला नसल्याने पोलिस अपयशाचे धनी ठरत आहेत.